दिपाली सय्यदने रुचिताच्या थेट कानाखाली वाजवली? राकेश बापटवरून पेटला भयंकर वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 14:07 IST2026-02-04T14:04:29+5:302026-02-04T14:07:15+5:30
दिपाली आणि रुचितामध्ये भांडण, 'बिग बॉस'च्या घरात मोठा ड्रामा, पाहा प्रोमो

दिपाली सय्यदने रुचिताच्या थेट कानाखाली वाजवली? राकेश बापटवरून पेटला भयंकर वाद
'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. या शोमध्ये एकापेक्षा एक हटके स्पर्धक सहभागी आहेत. 'बिग बॉस मराठी ६'च्या तिसऱ्या आठवड्यात अभिनेत्री सोनाली राऊत हिने घराचा निरोप घेतला. सोनालीने घरातून एक्झिट घेतल्यानंतर चौथ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच घरात मजेशीर ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. दिपाली सय्यद आणि रुचिता जामदार यांच्यात जोरदार भांडण झालं आहे. यामुळे घरातील वातावरण कमालीचे तापले आहे.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, दिपाली सय्यद आणि रुचिता जामदार यांच्यात राकेश बापट (आरबी) याच्यावरून वाद सुरु झाल्याचं दिसलं. रुचिताने दिपालीवर गंभीर आरोप केला. रुचिता इतर स्पर्धकांना सांगताना म्हणाली, "दिपालीने सर्वांना सांगितलं की रुचितानं राकेशला टच केलं". हा आरोप ऐकताच दिपालीचा पारा चढला. तिने हा आरोप फेटाळत स्पष्ट केले की, "रुचिता मी तुझ्यावर बोललेली नाही. मी नव्हती ती. मी नव्हती".
दोघींमधील वाद इतका विकोपाला गेला की रुचिता दिपालीला अंगावर चढू नकोस असं बोलते. यावर दिपाली "बोट खाली कर, बोट खाली कर", असं रुचिताला म्हणते. मग संतापलेली दिपाली हात उगारत "एक झानकन देईन ना" असं म्हणते, त्यावर रुचिता "चल मार" असं बोलते. त्यानंतर शेवटी कानाखाली वाजवल्याचा आवाज येतो. आता दिपालीने खरंच रागाच्या भरात रुचिताला कानाखाली मारली का? आणि जर असे घडले असेल, तर बिग बॉस दिपालीला घरातून बाहेर काढणार का? या प्रश्नांची उत्तरे आज रात्रीच्या एपिसोडमध्ये मिळणार आहेत.
कुठे पाहता येईल बिग बॉस मराठीचा सहावा सीझन?
'बिग बॉस मराठी' सिझन ६, दररोज रात्री ८:०० वाजता फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.