Bigg Boss Marathi 5 : 'ही' व्यक्ती आहे बिग बॉस मराठीच्या घरातील स्पाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 18:45 IST2024-08-01T18:44:35+5:302024-08-01T18:45:05+5:30
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात मजा, मस्तीसह भांडण, वाद आणि गॉसिप होताना दिसत आहे.

Bigg Boss Marathi 5 : 'ही' व्यक्ती आहे बिग बॉस मराठीच्या घरातील स्पाय
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात मजा, मस्तीसह भांडण, वाद आणि गॉसिप होताना दिसत आहे. घरातील सदस्य नेहमीच एकमेकांबद्दल गॉसिप करताना दिसून येतात. कधी कोण कोणाच्या बाजूने बोलेल आणि कधी कोण कोणाच्या विरोधात बोलेल हे सांगू शकत नाही. अशातच आता 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये 'बिग बॉस मराठी'च्या घरातले स्पाय कोण आहेत हे कळताना दिसत आहे.
प्रोमोमध्ये विनोदवीर पॅडी अर्थात पंढरीनाथ कांबळे आर्याबद्दल भाष्य करताना दिसतो आहे. पॅडी म्हणतोय,"तिने आजपण उडी घेतली आहे आणि मग ती येऊन आपल्याला सांगायला लागली". त्यावर अभिजीत सावंत म्हणतो,"तू आम्हाला सांगायला नको येऊ आपण ग्रूप बनवू ते... तू जर इकडे येत आहेस ना मग तू विनंती करुन ये". त्यानंतर पुढे पॅडी त्यांना 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वातील त्याला वाटणारे स्पाय कोण आहेत सांगताना दिसून येत आहे.
'संस्कृती जपत मी 'बिग बॉस मराठी'मध्ये खेळणार : अंकिता वालावलकर
दुसरीकडे आजच्या भागात अंकिता निक्कीसमोर आपली बाजू मांडताना दिसत आहे. अंकिता म्हणते,"मी स्वत:ला खूप कंट्रोल केलं होतं. माणूसकी सोडून जिंकण्यासाठी वेगळं वागू नको हे घरच्यांचे शब्द मला सारखे आठवतात. तू तुझ्या स्टॅटर्जीने खेळ आणि मी माझ्या स्टॅटर्जीने खेळते. संस्कृती जपत मी खेळेल".