Bigg Boss Marathi : 'बिग बॉस'च्या घरात सूरजला झालं 'गुलिगत प्रेम', रील स्टारचं रॅप साँग ऐकलं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 17:45 IST2024-07-30T17:44:52+5:302024-07-30T17:45:29+5:30
Bigg Boss Marathi Season 5 contestants: सूरजचा 'बिग बॉस मराठी'च्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत सूरज त्याच्या रॅप साँगने स्पर्धकांचं मनोरंजन करताना दिसत आहे.

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस'च्या घरात सूरजला झालं 'गुलिगत प्रेम', रील स्टारचं रॅप साँग ऐकलं का?
Bigg Boss Marathi Season 5: 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन नुकताच सुरू झाला आहे. यंदाच्या सीझनमध्ये होस्ट बदलण्यापासून ते स्पर्धकांपर्यंत अनेक सरप्रायजेस चाहत्यांना मिळाले आहेत. कलाकारांबरोबरच यंदा 'बिग बॉस मराठी'च्या घरात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रीलस्टारही पाहायला मिळत आहे. रीलस्टार सूरज चव्हाणने 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण, पहिल्या दिवसापासूनच सूरजने 'बिग बॉस मराठी'च्या घरात त्याची जागा बनवायला सुरुवात केली आहे.
सूरजचा 'बिग बॉस मराठी'च्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत सूरज त्याच्या रॅप साँगने स्पर्धकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. गुलिगत धोका म्हणत प्रसिद्धीझोतात आलेला सूरज गुलिगत प्रेम झाल्याचं व्हिडिओत म्हणताना दिसत आहे.
सूरज चव्हाणचं रॅप साँग
तू गं दिलाची राणी...
माझा प्रेम आहे सच्चा,
नको देऊ धोका 'गुलिगत'
ऐक ना माझ्या बच्चा...बँड बँड म्हणून जीव तुझ्यावर आलंया,
आणि गुलिगत प्रेम राणी तुझ्यावर झालंया...माझा पॅटर्नच भारी, माझी वेगळीच अदा
मला म्हणती गुलिगत, माझा काम नाही साधा
SQ RQ ZQ म्हणून तुलाच गेलंया...
अन गुलिगत प्रेम राणी तुझ्यावर झालंया
सूरजचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याचं हे रॅप साँग प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरलं आहे. कलर्स मराठीने शेअर केलेल्या 'बिग बॉस मराठी'च्या घरातील या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरातले स्पर्धक
वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण