Bigg Boss Marathi 5: प्रीमियरलाच कोकणकन्या-अभिनेत्यामध्ये जुंपली; बिग बॉसच्या घरात दोघांची एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 21:29 IST2024-07-28T21:28:57+5:302024-07-28T21:29:44+5:30
बिग बॉस मराठी 5 धमाकेदार सुरुवात

Bigg Boss Marathi 5: प्रीमियरलाच कोकणकन्या-अभिनेत्यामध्ये जुंपली; बिग बॉसच्या घरात दोघांची एन्ट्री
Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचा लाडका रितेश देशमुख यंदा शोमध्ये होस्ट म्हणून दिसत आहे. कल्ला तर होणारच म्हणत त्याने बिग बॉसच्या होस्टिंगची सुरुवात केली आहे. बिग बॉसच्या घराची झलकही प्रेक्षकांनी पाहिली. विशेष म्हणजे बिग बॉस मराठी 5 च्या पहिल्या स्पर्धक अभिनेत्री वर्षा उसगांवकर घरात आल्या आहेत. तर आता दुसरा स्पर्धक कोण याची उत्सुकता असताना तेही नाव समोर आलं आहे.
सोशल मीडियावर लोकप्रिय असलेली इन्फ्लुएन्सर देवबागची अंकिता प्रभू वालावलकरने (Ankita Prabhu Walawalkar) बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. तसंच तिच्यासोबत अभिनेता निखिल दामलेही (Nikhil Damle) घरात पोहोचला आहे. निखिलने 'रमा राघव' मालिकेत राघवची भूमिका साकारली होती. अभिनेते आणि इन्फ्लुएन्सर यांच्यात नेहमीच वाद असतो. इन्फ्लुएन्सरला महत्व मिळाल्यावर अनेकदा कलाकारांनी यावर आक्षेप घेतला आहे. दोघांमध्ये स्टेजवरच थोडी नोकझोक सुरु झाली आहे. आता घरात गेल्यावर काय काय होतं हे पाहायला मजा येणार आहे.
यंदाच्या बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट
यंदा बिग बॉस मध्ये काहीच मोफत मिळणार नाहीए. सगळ्या गोष्टींसाठी स्पर्धकांना किंमत मोजावी लागणार आहे. बेडरुम, बाथरुम, किचन सगळीकडे पैसे भरावे लागणार आहेत. यासाठी १० हजार बिग बॉस करन्सीचा समावेश करण्यात आला आहे. यासोबत पॉवर कार्डही आहे. पॉवर कार्ड घेतलं तर कोणतीही ड्युटी करण्याची गरज नाही.