'बिग बॉस'च्या घरात होणार प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची वाइल्ड कार्ड एन्ट्री? त्यानेच दिली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 15:58 IST2024-08-09T15:58:38+5:302024-08-09T15:58:55+5:30

रोज नवे ट्विस्ट आणि नवी समीकरणं पाहायला मिळत असताना आता बिग बॉसच्या घरात आणखी एका मराठी अभिनेत्याची एन्ट्री होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. खुद्द अभिनेत्यानेच याबाबत हिंट दिली आहे.

bigg boss marathi 5 is marathi actor pushkar jog to take wild card entry in new season give hint | 'बिग बॉस'च्या घरात होणार प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची वाइल्ड कार्ड एन्ट्री? त्यानेच दिली हिंट

'बिग बॉस'च्या घरात होणार प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची वाइल्ड कार्ड एन्ट्री? त्यानेच दिली हिंट

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे. यंदाच्या सीझनमध्ये पहिल्या दिवसापासूनच अनेक सरप्रायजेस चाहत्यांना मिळत आहेत. सेलिब्रिटींबरोबरच रीलस्टार आणि काही नवे चेहरेदेखील यंदा बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाले. रोज नवे ट्विस्ट आणि नवी समीकरणं पाहायला मिळत असताना आता बिग बॉसच्या घरात आणखी एका मराठी अभिनेत्याची एन्ट्री होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. खुद्द अभिनेत्यानेच याबाबत हिंट दिली आहे. 

बिग बॉस मराठीच्या घरातील निक्की तांबोळी आणि छोटा पुढारी घनश्याम दरवडे यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत निक्की घनश्यामला किस करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने या व्हिडिओवर "आणखी काय काय बघावं लागणार आहे?" अशी कमेंट केली आहे. या कमेंटला मराठी अभिनेत्याने रिप्लाय करत "कदाचित मलाही बघावं लागेल" असं म्हटलं आहे. हा अभिनेता म्हणजे पुष्कर जोग आहे. त्याच्या या कमेंटमुळे तो बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये पुष्कर जोग सहभागी झाला होता. 

दरम्यान, पहिल्या आठवड्यात धनंजय नॉमिनेट झाला होता. या आठवड्यात मात्र तो सेफ आहे. पण, निक्की मात्र या आठवड्यात नॉमिनेट झाली आहे. निक्कीबरोबर योगिता चव्हाण, पॅडी कांबळे, सूरज चव्हाण, निखिल दामले, घनश्याम दरवडे हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. 

'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक 

वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण

Web Title: bigg boss marathi 5 is marathi actor pushkar jog to take wild card entry in new season give hint