निक्की-अरबाजनं दिलेला शब्द मोडला, छोटा पुढारी म्हणाला "आपलं कोण, परकं कोण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 16:25 IST2024-12-26T16:23:01+5:302024-12-26T16:25:07+5:30
व्हिडीओ शेअर करत घन:श्याम राग व्यक्त केलाय.

निक्की-अरबाजनं दिलेला शब्द मोडला, छोटा पुढारी म्हणाला "आपलं कोण, परकं कोण..."
छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरोडे (Ghanshyam Darode) याचा नुकताच वाढदिवस झाला. त्याच्या गावी घन:श्यामच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला 'बिग बॉस' फेम जान्हवी किल्लेकर आणि पुरुषोत्तम दादा पाटील हे पोहचले होते. मात्र, घन:श्यामचे जवळचे मित्र निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अरबाज पटेल (Arbaz Patel) हे मात्र गैरहजर राहिले. विशेष म्हणजे निक्की आणि अरबाजनं घन:श्यामला त्याच्या वाढदिवशी गावी येण्याचं वचन दिलं होतं. हे वचन त्यांनी मोडल्यानं घन:श्याम हा नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय.
काही दिवसांपुर्वी घन:श्यामनं मुंबईत निक्की आणि अरबाज यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यानं एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात निक्की आणि अरबाज यांनी घनःश्यामला डिसेंबर महिन्यात त्याच्या वाढदिवसाला गावी जाऊन भेटण्याचं वचन दिल्याचं दिसत आहे. हाच व्हिडीओ पुन्हा शेअर करत घन:श्याम राग व्यक्त केलाय. घन:श्यामनं कॅप्शनमध्ये लिहलं, "आज समजलं दिलेला शब्द खरा कोण करतं ..? कोण फक्त बोलतं ..? कोण माझ्यासाठी आले ..? आपलं कोण परकं कोण तुम्ही ठरवा आता".
बिग बॉसच्या घरात घन:श्यामनं निक्की तांबोळीला बहिण मानलं होतं. त्यामुळे तो लाडाने तिला 'निक्कू ताई' असं म्हणतो. अगदी 'बिग बॉस'चा शो संपल्यावर देखील छोटा पुढारी निक्की-अरबाजला त्यांच्या मुंबईतील घरी खास भेटायला गेला होता. त्याचे निक्की सोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेले. आता घन:श्यामच्या व्हिडिओवर अरबाज आणि निक्की काय प्रतिक्रिया देतात, की मौन हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.