बिग बॉसने घनश्यामला दिला शॉक, घनश्यामचे Expression पाहून घरच्यांना आलं हसू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 12:29 IST2024-09-01T11:43:38+5:302024-09-01T12:29:37+5:30
भाऊच्या धक्क्यावरील आजच्या भागात कोणाची कानपिळी केली जाणार? तर कोणाचं कौतुक होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

बिग बॉसने घनश्यामला दिला शॉक, घनश्यामचे Expression पाहून घरच्यांना आलं हसू
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाला जोरदार सुरुवात झाली आहे. २८ जुलैपासून सुरू झालेलं 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. या पर्वातील स्पर्धकांनी पहिल्या दिवसापासूनच स्वतःची रणनीती दाखवण्यास सुरुवात केली आहे. कलर्स मराठी वाहिनीने नुकताच बिग बॉसचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेशने सर्वांना जबरदस्त शॉक दिल्याचं दिसून येत आहे. यावेळी शॉकदरम्यान घन:श्यामची उडालेली तारांबळ पाहायला मिळतेय.
भाऊच्या धक्क्यावर रितेश सर्वांसोबत खेळ खेळताना पाहायला मिळतोय. या खेळात रितेश शॉक देणाऱ्या खुर्चीवर असणाऱ्या सदस्याला प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाचं उत्तर जर चुकलं तर सदस्याला शॉक दिला जातो. या खेळात बहुतेक सदस्यांना शॉक बसला आहे. बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये रितेशने प्रश्न केला की,घनश्यामची घरातील लाडकी व्यक्ती कोण ?. यावेळी चिटिंग केल्याने घनश्यामला शॉक दिला. शॉक बसताच घनश्यामचे Expression पाहून होस्ट रितेशसह घरच्यांनाही हसू आलं.
भाऊच्या धक्क्यावरील आजच्या भागात कोणाची कानपिळी केली जाणार? तर कोणाचं कौतुक होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. या आठवड्यात व्होटिंग लाईन्स बंद असल्यामुळे बिग एलिमिनेशनच्या बाबतीत बिग बॉसचा काय निर्णय असेल याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. ‘बिग बॉस मराठी’ हा शो दररोज रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होतो. तसेच तुम्ही जिओ सिनेमावरही हा शो पाहू शकता.