Bigg Boss Marathi 4 : तिचे सेटवर इतके नखरे असायचे की... किरण मानेंचे स्रेहलतावर गंभीर आरोप, वाचा काय आहे भानगड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 12:24 PM2022-11-04T12:24:20+5:302022-11-04T12:25:14+5:30

Bigg Boss Marathi 4 Updates : अमृता धोंगडे आणि विकास हे गप्पा मारत असताना किरण माने स्नेहलतावर एक गंभीर आरोप करताना दिसले....

Bigg Boss Marathi 4 Updates Kiran Mane Allegation On Snehlata Vasaikar | Bigg Boss Marathi 4 : तिचे सेटवर इतके नखरे असायचे की... किरण मानेंचे स्रेहलतावर गंभीर आरोप, वाचा काय आहे भानगड

Bigg Boss Marathi 4 : तिचे सेटवर इतके नखरे असायचे की... किरण मानेंचे स्रेहलतावर गंभीर आरोप, वाचा काय आहे भानगड

googlenewsNext

गेल्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये (Bigg Boss Marathi 4 ) पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. योगेश जाधव घरातून बाद झाला आणि अभिनेत्री स्रेहलता वसईकरची (Snehlata Vasaikar)  घरात एन्ट्री झाली. स्रेहलताने ‘बिग बॉस मराठी 4’च्या घरात धमाकेदार एन्ट्री घेतली. विशेष म्हणजे एन्ट्री घेताच ती किरण मानेंची खरडपट्टी काढताना दिसली. किरण माने (Kiran Mane) सतत त्याच त्या चुका करतात. त्यांचा दृष्टिकोन अतिशय घाणेरडा आहे. ते विकासचा वापर करतात, असं काय काय ती बोलली. आताश: स्रेहलता घरात चांगलीच मुरली आहे आणि विशेष सगळ्यांना तोडीस तोड फाईट देताना दिसतेय.

नुकतंच बिग बॉसच्या घरात ‘खुल्ला करायचा राडा’ हे साप्ताहिक कार्य पार पडलं. यात टीम बी विजयी ठरली. यावेळी किरण माने, अमृता धोंगडे आणि विकास हे गप्पा मारत असताना किरण माने स्नेहलतावर एक गंभीर आरोप करताना दिसले. तिच्यामुळे एक मालिका बंद पडली, असं ते म्हणाले. 


 
तिचे सेटवर इतके नखरे...
किरण माने स्रेहलताबद्दल बरंच काही बोलले. ते म्हणाले, ‘तिचे सेटवर इतके नखरे असायचे की तिने एका चॅनलला सळो की पळो करुन सोडलं होतं. तिच्यामुळे सेटवर कधीच वातावरण चांगलं नसायचं.  मी माझं काम करायचो आणि परत यायचो. वर्षभर मी कसंतरी सहन केलं. दर आठवड्याला मिटींग असायची. त्यात काय तर ते सेटवरची भांडण मिटवायचे. सगळं मिटलं असं वाटलं की, परत ही काही तरी सुरु करायची. दहा दिवसांनी चॅनलवाले यायचे, सेट काय चाललंय, कोणाचं कोणाशी पटत नाही. ही प्रत्येकवेळी भांडण लावण्यात सर्वात पुढे असायची. त्यावेळी त्या मालिकेचा टीआरपी जोरात होता. मात्र या सगळ्या प्रकारामुळे ती मालिका बंद पडण्याची वेळ आली. यानंतर मात्र मी भडकलो.  सेटवर कधीही न बोलणारा माणूस बोलायला लागला, हे बघून तिला धक्का बसला होतो.  इतकी चांगली मालिका तुझ्यामुळे बंद पडते. इतक्या लोकांच्या पोटावर पाय आला तो तुझ्यामुळे आला. तिला उद्या लगेच काम मिळेल. पण बाकीच्याचे काय?  असा प्रश्नही मी केला होता.

 

Web Title: Bigg Boss Marathi 4 Updates Kiran Mane Allegation On Snehlata Vasaikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.