Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात राखी सावंत या अभिनेत्यासोबत करतेय फ्लर्ट, जाणून घ्या कोण आहे तो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 13:57 IST2022-12-05T13:56:45+5:302022-12-05T13:57:10+5:30
Rakhi Sawant: बिग बॉस मराठीच्या घरात राखी आल्यापासून सदस्यांसोबत ती बरीच धम्माल मस्ती करत असते.

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात राखी सावंत या अभिनेत्यासोबत करतेय फ्लर्ट, जाणून घ्या कोण आहे तो?
बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)च्या घरात या आठवड्यात चार चॅलेंजर्सची एन्ट्री झाली. त्यांच्या येण्यामुळे खेळात धम्माल आली आणि घरातील सदस्यांची नातीदेखील बदलताना दिसली. नव्या सदस्यांच्या घरात येण्याने खेळ बदलताना दिसतोय. त्यात बिग बॉस मराठीच्या घरात राखी सावंत (Rakhi Sawant) आल्यापासून सदस्यांसोबत ती बरीच धम्माल मस्ती करत असते. आज घरात राखी प्रसादसोबत फ्लर्ट करताना दिसणार आहे.
राखी बोलता बोलता प्रसादकडे गेली आणि... प्रसादने राखीची माफी मागितली. प्रसाद म्हणाला, माझी आई... राखी मी तुझ्या पाया पडतो... मला माफ कर. त्यावर अमृता देशमुख म्हणाली, काय प्रसाद कसला बोर आहेस तू... राखी प्रसादला म्हणाली, काय झालं तुझ्या हृदयात? धकधक करने लगा क्या?
अक्षय म्हणाला, त्याच्या हृदयातला घोडा धावायला लागला बघ... प्रसाद म्हणाला, आज दहन करणारच आहे मी ... अमृता देशमुख म्हणाली, कितना अच्छा मौका था यार... प्रसाद म्हणाला, हिच्या अंगावर पड... राखी म्हणाली, मी मुलींच्या अंगावर नाही पडत...
रोहित शिंदे पडला घराबाहेर
बिग बॉसच्या चावडी मध्ये प्रेक्षकांना तसेच घरातील सदस्यांना खूप मोठा धक्का बसला जेव्हा महेश सरांनी विशाल आणि मीरा यांना घरातून बाहेर येण्यास सांगितले आणि हे देखील म्हणाले कि हे दोघे एकाच आठवड्यासाठी घरात होते... तरीदेखील या आठवड्यात एक सदस्य घराबाहेर देखील जाणार हे निश्चित. या आठवड्यात चार नॉमिनेटेड झालेल्या सदस्यांपैकी म्हणजेच अपूर्वा, प्रसाद, रोहित आणि अमृता देशमुख यांच्यापैकी रोहित शिंदेला घराबाहेर पडावे लागले.