' हा कांगारु तुझी वाट पाहतोय'; अमृता अन् प्रसादमध्ये नेमकं चाललंय तरी काय? अभिनेत्याच्या कमेंटची होतीये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 04:24 PM2023-05-11T16:24:23+5:302023-05-11T16:25:21+5:30

Amruta deshmukh: अमृताच्या पोस्टवर प्रसादने केलेली कमेंट सध्या चर्चेत येत आहे.

bigg boss marathi 4 prasad jawade comment on amruta deshmukh visit australia | ' हा कांगारु तुझी वाट पाहतोय'; अमृता अन् प्रसादमध्ये नेमकं चाललंय तरी काय? अभिनेत्याच्या कमेंटची होतीये चर्चा

' हा कांगारु तुझी वाट पाहतोय'; अमृता अन् प्रसादमध्ये नेमकं चाललंय तरी काय? अभिनेत्याच्या कमेंटची होतीये चर्चा

googlenewsNext

बिग बॉस मराठीच्या (Bigg boss marathi) चौथ्या पर्वातून चर्चेत आलेली जोडी म्हणजे अभिनेत्री अमृता देशमुख (amruta deshmukh) आणि प्रसाद जवादे (prasad jawade).  गेल्या काही काळापासून ही जोडी सातत्याने चर्चेत येत आहे. इतकंच कशाला तर या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चाही प्रचंड रंगल्या. यामध्येच आता अमृताच्या पोस्टवर प्रसादने केलेली कमेंट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

सध्या अमृता तिच्या  नियम आणि अटी लागू या नाटकाच्या दौऱ्यावर आहे. या संपूर्ण नाटकाची टीम सध्या ऑस्ट्रेलियात प्रयोग करत असून तिने नुकतीच एक पोस्ट करत ती ऑस्ट्रेलियाला जात असल्याचं सांगितलं. यावर प्रसादने कमेंट करत तो तिला मिस करत असल्याचं म्हटलं आहे.

“ऑस्ट्रेलियाच्या सगळ्या नियम आणि अटी मान्य करून शेवटच्या क्षणी visa मिळवून माझ्या “नियम व अटी” perform करायला निघालेली मी. नियम व अटी लागू नाटकाचे मेलबर्न आणि सिडनी येथे दोन शो करत आहे”, असं कॅप्शन देत अमृताने ही पोस्ट शेअर केली.त्यावर प्रसादने स्वत:ला कांगारु म्हणत त्यावर कमेंट केली.

“ऑल द बेस्ट अमू. मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. सुरक्षित राहा. हा कांगारु तुझी वाट पाहात आहे”, अशी कमेंट प्रसादने केली. त्यामुळे या दोघांची नव्याने चर्चा रंगली आहे.

दरम्यान ‘बिग बॉस’च्या घरात अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांच्यात छान मैत्री झाली. हा शो संपल्यानंतरही त्या दोघांना बऱ्याचदा एकत्र स्पॉट करण्यात आलं. त्यामुळे त्यांच्या नात्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र, या विषयी अद्यापही दोघांनी भाष्य केलं नाही. त्यामुळे ही खरोखर मैत्री आहे की त्यापलिकडचं नातं हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
 

Web Title: bigg boss marathi 4 prasad jawade comment on amruta deshmukh visit australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.