Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरामधून मेघा घाडगे बाहेर!, म्हणाली - या माणसापासून सांभाळून राहा…
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 11:00 IST2022-10-24T10:59:30+5:302022-10-24T11:00:04+5:30
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर मेघा घाडगेनं घरतल्या सदस्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरामधून मेघा घाडगे बाहेर!, म्हणाली - या माणसापासून सांभाळून राहा…
बिग बॉस मराठीची या आठवड्यातील चावडी चांगलीच रंगली. आरोप प्रत्यारोप तर बघायला मिळालेच पण, काही सदस्यांना आता जागं होण्याची गरज आहे असे देखील महेश मांजरेकरांनी सांगितले. तर योगेशला सक्त ताकीद मिळाली जर या पुढे कोणाचा बाप काढला तर घरामधून बाहेर काढेन. काही सदस्यांना पत्राद्वारे आपल्या व्यक्त करण्याची संधी बिग बॉस यांनी दिली.
तेजस्विनीने अमृता धोंगडेसाठी तर प्रसादने योगेशसाठी पात्र लिहिले... तर अमृता देशमुखने प्रसादसाठी पत्र लिहिले तर किरण माने यांनी विकासाठी. याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT चुगली बूथद्वारे आलेल्या चुगलीमुळे अपूर्वा अमृता धोंगडे वर चांगलीच भडकली, "आयुष्यात पुन्हा असं बोलीस तर खूप महागात पडेल” असे अपूर्वाने तिला बजावून सांगितले. तर दिवाळीनिमित्त काही स्पेशल भेटवस्तू सदस्यांनी एकमेकांना दिल्या. ज्यामध्ये त्रिशूलने योगेशला नारळ देऊन बाहेरचा रस्ता दाखवला, तर अपूर्व मिळाली काडेपेटी. तेजस्विनीला मिळाले रिमोट कंट्रोल.
VOOT आरोपी कोण मध्ये विकासला आरोपी ठरवले आणि शिक्षा देखील सुनावली. कारण देखील दिले का तो या आठवड्याचा आरोपी आहे, कारण किरण माने सांगतात तेच तो करतो. आणि तो क्षण आला जो कधीच येऊ नये असे घरातील प्रत्येक सदस्याला वाटत असते. मेघा घाडगेला घराबाहेर पडावे लागले. "अमृता देशमुख धन्यवाद मला चूक नसताना नॉमिनेट केलं... किरण माने तुमच्यामुळे मी बाहेर आले आहे. AV पहिली मी या माणसापासून सांभाळून राहा" घरच्यांना मेघा घाडगेने सल्ला दिला.
पुढच्या आठवड्यात कोण राहील ? कोण जाईल ? हे ठरवेल त्यांचा गेम. कोण होईल कॅप्टन ? कोण होईल नॉमिनेट ? कोण होईल सेफ ? बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वाजता आणि शनि - रवि रात्री ९.३० वाजता आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर पाहता येईल.