Bigg Boss marathi 4: घरात एंट्री करताच मीरानं अक्षयला दिला हा मोलाचा सल्ला !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 16:22 IST2022-11-28T16:16:21+5:302022-11-28T16:22:23+5:30
आज बिग बॉस मराठीच्या घरात काल घरात एक नाही, दोन नाही तर चार जणांची चॅलेंजर्स म्हणून एन्ट्री झाली.

Bigg Boss marathi 4: घरात एंट्री करताच मीरानं अक्षयला दिला हा मोलाचा सल्ला !
आज बिग बॉस मराठीच्या घरात काल घरात एक नाही, दोन नाही तर चार जणांची चॅलेंजर्स म्हणून एन्ट्री झाली. विशाल निकम, आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथ आणि राखी सावंत यांनी बिग बॉसच्या घरात दमदार एंट्री घेतली आहे. या चौघांच्या एंट्रीमुळे घरातला खेळ कसा बदलणार हे लवकरच कळेलं. दरम्यान मीरा अक्षयशी चर्चा करताना दिसणार आहे. मीरा आणि अक्षयमध्ये आज प्रसाद बद्दल चर्चा होणार आहे. मीरा अक्षयला सल्ला देणार आहे.
मीरा अक्षयला सांगताना दिसणार आहे, इरिटेड कर… का माहिती आहे का ? तेव्हा त्याच्या आतला खरा प्रसाद निघेल…त्याला तोंडावर इरिटेड कर. अक्षय म्हणाला, नको आम्ही केलं आहे पहिल्या आठवड्यात आम्ही इरिटेड झालो काही गरज नाही ते करायची. करू दे ना त्याचं बाहेर निघेल..
अक्षय म्हणाला, हे त्याने आता सुरु केलं आहे. मीरा म्हणाली, हे बघ मला नाही माहिती मी आतमध्ये जसे माझ्याशी वागतील तसे वागणार आहे. मला काय म्हणायाचे आहे तो सोडतो आहे ना एक एक पिल्लू मध्येच नड ना तू , तोंडावर जाऊन विचार, तोंडावर बोल हळूहळू बोलू नकोस. अक्षयचे म्हणणे आहे, विचारलं मी, बोलो मी जेव्हा बोलायचं तेव्हा.. बाकी स्किप केलेलं आहे. उलटं आमच्यात चर्चा केलेली सुद्धा आवडत नाही लोकांना. जे पटत नाही त्यांना स्किप करणं... मीराचे यावर म्हणणे आहे, तुझा स्वभाव वेगळा आहे माझा वेगळा आहे.." आता हि चर्चा अजून किती वाढत गेली ? यावर मिरची काय म्हणणे पडले. बघूया आजच्या भागामध्ये.