Bigg Boss Marathi 4 Grand Finale : टॉप ३ स्पर्धक मिळाले ! कोल्हापूरची मिरची अमृता धोंंगडे घरातून बाहेर; कोण जिंकणार उत्सुकता आणखी ताणली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 21:57 IST2023-01-08T21:35:32+5:302023-01-08T21:57:00+5:30
अखेर तो क्षण आला आणि बिग बॉस मराठी ४ ला टॉप ३ स्पर्धक मिळाले आहेत. महाराष्ट्राची मिरची अमृता धोंगडे ही स्पर्धेतून बाहेर पडली आहे.

Bigg Boss Marathi 4 Grand Finale : टॉप ३ स्पर्धक मिळाले ! कोल्हापूरची मिरची अमृता धोंंगडे घरातून बाहेर; कोण जिंकणार उत्सुकता आणखी ताणली
Bigg Boss Marathi 4 Grand Finale : बिग बॉस मराठी ४ चा सोहळा दिमाखात सुरु आहे. ड्रामा क्वीन राखी सावंत ९ लाख रुपये घेऊन बाहेर पडल्यानंतर उत्सुकता होती ती टॉ़प ३ स्पर्धक कोण असणार याची. अखेर तो क्षण आला आणि बिग बॉस मराठी ४ ला टॉप ३ स्पर्धक मिळाले आहेत. महाराष्ट्राची मिरची अमृता धोंगडे ही स्पर्धेतून बाहेर पडली आहे.
बिग बॉस ४ चे टॉप ३ स्पर्धक
अपूर्वा नेमळेकर, किरण माने, अक्षय केळकर आणि अमृता धोंगडे यांच्यात एलिमिनेशन राऊंड झाल्यानंतर अमृता सोडून इतर तिघेही सेफ झाले. अशा प्रकारे अपूर्वा, किरण माने आणि अक्षय यांनी टॉप ३ मध्ये प्रवेश केला. आता उत्सुकता आणखी ताणली आहे. या तिघांमधून बिग बॉस ४ ची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
स्पर्धेतून बाहेर पडल्यावर अमृता म्हणाली, 'मला वाटलं होतं मी ४ आठवडेच घरात राहू शकेल पण मी १०० दिवस राहिले.आता कोण जिंकणार यावर ती सांगते, तिघांचा खेळ वेगळा आहे. अक्षय केळकर जिंकावा असं मला वाटतं. माने किंवा अपूर्वाचा खेळ मला फार आवडला नाही.
कलर्स मराठी वाहिनीवर रविवारी ८ जानेवारीला संध्याकाळी ७ वाजता या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. आता तीन स्पर्धकांमधून ट्रॉफीचा खरा विजेता किंवा विजेती कोण होणार याकडे लक्ष लागले आहे.