Bigg Boss Marathi 4, Day 14 : बिग बॉसच्या घरात यशश्री - अमृता देशमुखमध्ये कडाक्याचे भांडणं !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 13:43 IST2022-10-17T13:38:16+5:302022-10-17T13:43:57+5:30
यशश्रीने अमृता देशमुखला नॉमिनेट करणार असून त्यावर दोघींमध्ये कडाक्याचे भांडणं होणार आहे.

Bigg Boss Marathi 4, Day 14 : बिग बॉसच्या घरात यशश्री - अमृता देशमुखमध्ये कडाक्याचे भांडणं !
दोन आठवड्याच्या प्रवासानंतर कोणता सदस्य घराबाहेर जाईल हे जाणून घेण्यासाठी सगळे वाट बघत होते. कोणा एका सदस्याला घराबाहेर पडणे अनिवार्य असल्याने अमृता धोंगडे, रोहित शिंदे, अमृता देशमुख, रुचिरा जाधव आणि निखिल राजेशिर्के हे डेंजर झोनमध्ये आले ज्यामध्ये निखिल राजेशिर्के याला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.
आज घरामध्ये १४ व्या दिवशी “फटा पोश्टर निकाला झिरो” हे नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणाला नॉमिनेट करणार ? आणि कोणाला सेफ ? कोण घराबाहेर जाईल ? हे कळेल लवकरच.
यशश्रीने अमृता देशमुखला नॉमिनेट करणार असून त्यावर दोघींमध्ये कडाक्याचे भांडणं होणार आहे. अमृताचे म्हणणे आहे, "स्वतः काहीतरी विक्षिप्तासारखा वागायचं, या लोकांच्या जीवावर उड्या मारते आहेस ना ? यशश्रीने त्यावर उत्तर दिले, “मी इथे तुला प्रूफ करायला आले नाहीये, मी कोणाच्या जीवावर उड्या मारत नाहीये.
पुढच्या आठवड्यात कोण राहील ? कोण जाईल ? हे ठरवेल त्यांचा गेम. कोण होईल कॅप्टन ? कोण होईल नॉमिनेट ? कोण होईल सेफ ? जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.