Bigg Boss Marathi 4, Day 10 : बिग बॉसकडे अक्षयने केली एक आगळीवेगळी मागणी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 14:25 IST2022-10-12T14:22:54+5:302022-10-12T14:25:39+5:30
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना काहीना काही नवं शिकायाची संधी मिळतेच. पण अक्षयची बिग बॉस यांना एक विनंती आहे.

Bigg Boss Marathi 4, Day 10 : बिग बॉसकडे अक्षयने केली एक आगळीवेगळी मागणी !
छोट्या पडद्यावरील रिएलिटी शो बिग बॉस मराठीचा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4) २ ऑक्टोबर पासून कलर्स मराठी वाहिनीवर भेटीला आला आहे. यंदाच्या सीझनमध्ये प्रसाद जवादे, अमृता धोंडगे, निखिल राजशिर्के, किरण माने, समृद्धी जाधव, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, योगेश जाधव, अमृता देशमुख, यशस्वी मसुरेकर यांच्यासह इतर कलाकार सहभागी झाले आहेत. आज या सदस्यांचा घरातील दहावा दिवस आहे.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना काहीना काही नवं शिकायाची संधी मिळतेच. पण अक्षयची बिग बॉस यांना एक विनंती आहे. किचनमध्ये बटाटा, काकडी सोलायला जे सोलाणं ठेवले आहे ते अक्षयच्या मते वापरायला अत्यंत कठीण आहे.
अमृता देशमुख हिने त्याला ते कसे वापरावे हे देखील शिकवले... पण तरी त्याची बिग बॉस यांना विनंती आहे, "बिग बॉस माझं हे म्हणणं आहे टेक्निक्ली हे भले हे स्ट्रॉंग असेल, पण आपल्या जुन्या टेक्निक्सचं सोलाणं द्यावे... हे खुपचं अवजड आणि अवघड आहे". बघूया आजच्या भागामध्ये.