Bigg Boss Marathi 3, Episodes, 9 Nov: बिग बॉस मराठीच्या घरात घडणार 'न भूतो न भविष्यति' अशी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 11:12 IST2021-11-08T11:12:25+5:302021-11-08T11:12:51+5:30

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरामधून काल तृप्ती देसाई बाहेर पडल्या. आता खेळ अजूनच रंजक होत चालला आहे.

Bigg Boss Marathi 3,Episodes, 9 Nov: Bigg Boss Marathi will have a story like 'No ghost, no future' | Bigg Boss Marathi 3, Episodes, 9 Nov: बिग बॉस मराठीच्या घरात घडणार 'न भूतो न भविष्यति' अशी गोष्ट

Bigg Boss Marathi 3, Episodes, 9 Nov: बिग बॉस मराठीच्या घरात घडणार 'न भूतो न भविष्यति' अशी गोष्ट

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल तृप्ती देसाई बाहेर पडल्या. आता खेळ अजूनच रंजक होत चालला आहे. घरामध्ये ११ सदस्य उरले आहेत आणि यापुढे स्पर्धा अधिकच कठीण होत जाणार आहे. नवा आठवडा सुरू झाला असून, आठवड्याच्या सुरुवातीलाच सदस्यांमध्ये भांडण, वादविवाद आणि नवे ट्विस्ट बघायला मिळणार आहेत. या आठवड्यात येणार सीझनमधला सगळ्यात मोठा ट्विस्ट, कारण नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी तसेच काहीसे जाहीर केले आहे. 

बिग बॉस यांनी जाहीर केले की बिग बॉसच्या घरात ‘न भूतो न भविष्यति’ अशी गोष्ट घडणार आहे. कॅप्टन मीरा ठरवणार आहेत घरातील कोणते सदस्य या क्षणी घराबाहेर जाणार आहेत. आता नक्की घरामध्ये काय घडणार ? मीरा कोणत्या सदस्यांना निवडणार ? हे आजच्या भागात समजेल.
 
घरातील सदस्यांना अश्रु अनावर झाले..
मागील आठवड्यात नॉमिनेशनमध्ये आलेल्या सदस्यांमध्ये काल मीनल आणि विशाल सुरक्षित झाले. याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये व्हूटद्वारे आलेल्या फॅन्सची चुगली चुगली बूथद्वारे स्नेहा, विशाल यांना सांगितली. विकास, जय आणि विशाल यांनी बिग बॉसच्या चावडीमध्ये वूट द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली. आता जय, सोनाली आणि तृप्ती देसाई या तीन जणांमधून आज कोणाला घराबाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. जय दुधाणे आणि तृप्ती देसाई हे दोन सदस्य डेंजर झोनमध्ये आले असल्याचे महेश मांजरेकरांनी सांगितले. तृप्ती देसाई यांना या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले. घरातील सदस्यांना अश्रु अनावर झाले.

Web Title: Bigg Boss Marathi 3,Episodes, 9 Nov: Bigg Boss Marathi will have a story like 'No ghost, no future'