Video: ही दोस्ती तुटायची नाय! विशालला जिंकवण्यासाठी विकासने केला 'हा' मोठा त्याग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 19:24 IST2021-11-11T19:22:17+5:302021-11-11T19:24:04+5:30

Vikas patil: टास्कमध्ये एकमेकांशी कितीही भांडण केलं. तरीदेखील टास्क संपल्यावर ते एकत्र येतात.

bigg boss marathi 3 vishal and vikas friendship goals | Video: ही दोस्ती तुटायची नाय! विशालला जिंकवण्यासाठी विकासने केला 'हा' मोठा त्याग

Video: ही दोस्ती तुटायची नाय! विशालला जिंकवण्यासाठी विकासने केला 'हा' मोठा त्याग

छोट्या पडद्यावरील बिग बॉस (bigg boss) या शोमध्ये जसे स्पर्धकांमध्ये दररोज वाद रंगताना पाहायला मिळत असतात. त्याच प्रकारे काही स्पर्धकांमध्ये निर्माण झालेली मैत्रीही पाहायला मिळते. सध्या बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या (bigg boss marathi 3) पर्वात अशीच मैत्री विशाल निकम (vishal nikam) आणि विकास पाटील (vikas patil) यांच्यात पाहायला मिळत आहे. टास्कमध्ये एकमेकांशी कितीही भांडण केलं. तरीदेखील टास्क संपल्यावर ते एकत्र येतात. विशेष म्हणजे यावेळी या दोघांनी केलेलं काम पाहून अनेकांनी त्यांच्या मैत्रीला सलाम केलं आहे. 

आज जय आणि विशाल या दोघांमध्ये कॅप्टन्सी टास्क रंगणार आहे. मात्र, त्यांना कॅप्टन पदापर्यंत पोहोचवण्यासाठी घरातील स्पर्धकांना त्यांच्या काही महत्त्वाच्या गोष्टींचा त्याग करावा लागणार आहेत. यावेळी विकास, विशाल घराचा कॅप्टन व्हावा यासाठी त्याचे संपूर्ण केस कापणार आहे. इतकंच नाही तर विकास करत असलेला त्याग पाहून विशालही स्वत:चे केस कापणार आहे.

दरम्यान, आज रंगणाऱ्या टास्कमध्ये विकासप्रमाणेच दादूसलाही त्यांचे केस गमवावे लागणार आहेत. तर, मीराला तिचा soft toy आणि परिवारातील फोटोंचा त्याग करावा लागणार आहे. त्यामुळे आता घरातील स्पर्धक जय-विशाल पैकी एकाला कॅप्टन करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा त्याग करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 
 

Web Title: bigg boss marathi 3 vishal and vikas friendship goals