Bigg Boss Marathi 3 : विकास, मीनल आणि सोनालीमध्ये सुरू आहे प्लॅनिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 07:14 PM2021-11-29T19:14:25+5:302021-11-29T19:14:49+5:30

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज पार पडणार आहे नॉक आउट हे नॉमिनेशन कार्य. 

Bigg Boss Marathi 3: Vikas, Meenal and Sonali's planning | Bigg Boss Marathi 3 : विकास, मीनल आणि सोनालीमध्ये सुरू आहे प्लॅनिंग

Bigg Boss Marathi 3 : विकास, मीनल आणि सोनालीमध्ये सुरू आहे प्लॅनिंग

googlenewsNext

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज पार पडणार आहे नॉक आउट हे नॉमिनेशन कार्य. टॉप ८ पर्यंत पोहचल्यावर ही स्पर्धा अधिकच कठीण होत जाणार हे निश्चित...इथेपर्यंत पोहचल्यानंतर कोणत्याच सदस्याला आता नॉमिनेशनची टांगती तलवार डोक्यावर नको आहे आणि त्यामुळे आता प्रत्येक सदस्य यातून स्वत:ला कसे वाचवता येईल यावर लक्ष केंद्रीत करताना दिसणार आहेत. आज टास्क दरम्यान विकास, सोनाली आणि मीनल चर्चा करताना दिसणार आहेत.
 

विकास सोनालीला सांगताना दिसणार आहे, दोन गोष्टी आहेत लक्षात ठेव, तुझ्याकडे उत्कर्ष येणार तो बोलणार तू माझे टाकू नकोस मी तुझे नाही टाकत. तो येणार तुला म्हणणार माझे टाकू नकोस, मीराचे टाकू नकोस मी तुझे टाकत नाही. तू काय म्हणायचे असे झाल्यावर कोणीच जाणार नाही. मग हक्क कोणाकडे येणार संचालकाकडे. संचालक कोणाचे नाव घेणार सोनालीचे. हे जरा लक्षात घे आणि मग ठरव. विशालने आता परत खूप मोठी चूक केली. 
मीनल त्यावर म्हणाली, त्याने परत तीच चूक केली. जर त्याने कोणा दुसर्‍यासोबत डील केली असती ना तर गोष्ट वेगळी आहे. जयने म्हणून ही डील केली... पण जर त्याला असं करायचं आहे तर करू दे.

...आता येणारच ना कॅप्टन्सी टास्क

विकास म्हणाला, करू दे... आता येणारचं ना कॅप्टन्सी टास्क आणि त्याला टाकू आपल्या टीममध्ये... नक्की जयने आणि विशालने काय डील केली? आणि विशालची डील जयने स्वीकारली ? आणि स्वीकारली तर का ? ही आजच्या भागामध्ये कळेलच. विकास इथे बोलताना बोलून गेला आपल्या टीममध्ये टाकू दे त्याला. म्हणजे यांचा ग्रुप तुटला म्हणायचं का ? नक्की काय होणार या टास्कमध्ये ? कोण होणार सेफ ? हे आजच्या भागात समजेल.

Web Title: Bigg Boss Marathi 3: Vikas, Meenal and Sonali's planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.