Bigg Boss Marathi 3 Upadate: उत्कर्ष आणि मीराच्या मते हे सदस्य घराबाहेर जाण्यास आहेत पात्र ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 14:58 IST2021-11-19T14:58:10+5:302021-11-19T14:58:24+5:30
स्नेहा किंवा सोनाली कोण जाणार घराबाहेर ?

Bigg Boss Marathi 3 Upadate: उत्कर्ष आणि मीराच्या मते हे सदस्य घराबाहेर जाण्यास आहेत पात्र ?
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दर शुक्रवारी घरातील काही सदस्यांमध्ये ही चर्चा नक्कीच रंगते की या आठवड्यात कोणता सदस्य घरी जाण्याची शक्यता आहे. वा गेला पाहिजे, या सदस्याने वेळ देऊन देखील हवातसा गेम नाही दाखवला वैगरेवैगरे. आजदेखील घरात उत्कर्ष आणि मीरामध्ये हीच चर्चा रंगली आहे. तसेच गायत्रीला आता टास्क खेळण्यास मनाई आहे. आणि याबद्दल चर्चा होत असताना. गायत्रीला उत्कर्ष म्हणाला, हेच बिग बॉस लास्ट टाईम देखील बोले होते, खेळताना तुम्ही तुमची आणि समोरच्याची काळजी घ्या.
मीराचे म्हणणे आहे, मला असं खूप वाटतं आहे की, स्नेहा किंवा सोनाली जाणार. उत्कर्ष त्यावर म्हणाला, हो जायला तर पाहिजे. म्हणून तर त्यांना दिलं होतं तुम्ही एक आठवडा नॉमिनेट व्हाल पुढच्या आठवड्यात. तरी त्यांनी गेम काहीच दाखवला नाहिये. त्यावर मीरा म्हणाली, सोनाली तरी राहू शकते.उत्कर्ष म्हणाला, मला असं वाटतं सोनाली या आठवड्यात होईल आणि पुढच्या आठवड्यात स्नेहा आऊट होणार. मीराचं म्हणणं आहे या आठवड्यात स्नेहा जाणार. सोनाली नाही जाणार..बघूया अजून काय चर्चा केली या दोघांनी आजच्या भागामध्ये ते कळेलच.
आज बिग बॉस गायत्रीला एक विशेष सूचना देणार आहेत. बिग बॉस यांनी गायत्रीला सांगितले, आजचे कार्य पार पाडताना आपल्याला दुखापत झाली. तसेच पुढील किमान तीन आठवडे आपल्याला स्लिंग घालायचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.आता आपल्याला त्वरित आराम मिळणे जास्त आवश्यक आहे. असे बिग बॉस यांनी गायत्रीला सांगितले. गायत्रीला आता स्वतः बिग बॉसनेच आराम करण्यासाठी सांगितल्याने आता कोणत्याही कार्यात गायत्रीला स्वतःचा परफॉर्मन्स सादर करता येणार नाही. त्यामुळे इतरांवरच रसिकांचे लक्ष खिळून राहणार हे मात्र नक्की. गायत्री नेमकं काय करते हे तर आगामी भागातच कळेल.