Bigg Boss Marathi 3 : '...तोच खरा मान असतो'- जय दुधाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 14:51 IST2021-10-27T14:51:11+5:302021-10-27T14:51:34+5:30

टीम B मधील सदस्य आज डेव्हिल बनणार असून विशाल त्याच्या डेव्हिल रूपात घरामध्ये बराच हंगामा करताना दिसणार आहे.

Bigg Boss Marathi 3: '... That is the true honor' - Jay Dudhane | Bigg Boss Marathi 3 : '...तोच खरा मान असतो'- जय दुधाणे

Bigg Boss Marathi 3 : '...तोच खरा मान असतो'- जय दुधाणे


बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेल्या टास्कमध्ये आज दादूस आणि मीनलच्या वाट्याला देखील येणार आहे कठीण टास्क. घरात सुरू झालेल्या नव्या टास्कमध्ये प्रत्येक सदस्याच्या संयमची कसोटी लागते आहे. आज टीम B मधील सदस्य डेव्हिल बनणार असून विशाल त्याच्या डेव्हिल रूपात घरामध्ये बराच हंगामा करताना दिसत आहे. विशालची वेगळीच बाजू या टास्कमुळे प्रेक्षकांना दिसते आहे. विशाल आणि विकासच्या भांडणानंतर आज विशाल दादूसना एक टास्क देताना दिसणार आहे. तर जय आणि सोनाली मीनलला एक मजेदार टास्क देणार आहे. 
 
विशाल दादूसना सांगणार आहे गाणं म्हणा एक... मोठं गाणं, चांगलं गाणं म्हणा ... रागात म्हणा... अशा ऑर्डर देताना दिसणार आहे. दादूस यांनी गाणे तयार देखील केले “एकच वादा, आमचा विशाल दादा...तर दुसरीकडे मीनलला सोनाली आणि जय म्हणत होते असे करताना तुम्ही, राग आलाय राग आलाय... खूप राग येतोय, मीनल ताईंना राग येतो आहे.

स्वत:ची वाहवा नाही करायची - जय 
जय म्हणाला, आता रागवाना एकदा, काय बोलत होता आम्हांला आमच्याबद्दल बोलता येत नाही... अहो आमच्याबद्दल भरपूर बोलत आहेत, लोक आमची प्रशंसा करत आहेत... त्याच्यामध्येच आम्ही जिंकतो. तोच खरा मान असतो...यात काही मान नसतो. स्वत:च आपल्याबद्दल बोलायचं, स्वत:ची वाहवा नाही करायची, लोकांनी केली पाहिजे. आज टास्कमध्ये काय घडणार हे जाणून घेण्यासाठी आजचा बिग बॉस मराठी ३चा एपिसोड पहावा लागेल.

Web Title: Bigg Boss Marathi 3: '... That is the true honor' - Jay Dudhane