Bigg Boss Marathi 3: सुरेखा कुडची आणि आदिश वैद्यमध्ये झाले कडाक्याचे भांडण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 16:53 IST2021-10-14T16:52:36+5:302021-10-14T16:53:23+5:30
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आदिश वैद्य आल्यापासून त्याचे काही सदस्यांशी खटके उडत आहेत.

Bigg Boss Marathi 3: सुरेखा कुडची आणि आदिश वैद्यमध्ये झाले कडाक्याचे भांडण
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आदिश वैद्य आल्यापासून त्याचे काही सदस्यांशी खटके उडत आहेत. पहिले जयसोबत बाचाबाची झाली मग स्नेहाच्या रागाचा त्याला सामना करावा लागला आणि आता आजच्या भागामध्ये त्याचे आणि सुरेखा ताईंचे कडक्याचे भांडण होणार आहे. आज BB College मध्ये सुरेखा कुडची, मीरा जगन्नाथ, सोनाली पाटील हे प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांचे क्लास घ्यायला घेणार आहेत. कारण, बिग बॉस यांनी सदस्यांवर “करूया आता कल्ला” हे साप्ताहिक कार्य सोपवले आहे.
उत्कर्ष, दादूस, आदिश आणि सोनाली यांच्या क्लासनंतर सुरेखा कुडची देखील प्राध्यापक म्हणून क्लास घ्यायला येणार आहेत. क्लासमध्ये आल्यानंतर त्यांनी स्नेहा वाघचे कौतुक केले, विशाल निकमशी गंमतीशीर संवाद साधला. पण काही वेळानंतर मात्र घराचे वातावरण थोडे बदलताना दिसले.
सुरेखा कुडची यांचा क्लास सुरू असताना आदिश वैद्य त्यांना म्हणाला, “चला चला कार्य सुरू ठेवा”. त्यावर सुरेखाताई म्हणाल्या, “प्रोफेसर आदिश वैद्य यांना विनंती “मी” करते की प्लीझ (तोंड बंद ठेवा). कारण तुमची जस्ट एंट्री झाली आहे BB मध्ये, आम्ही जुने आहोत.” सुरेखा कुडची यांच्या या प्रतिक्रियेमुळे आदिशल राग अनावर झाला. तो म्हणाला, “कालपर्यंत गेम खेळायचा नव्हता ना या बाईला, स्वत:ला जायचे होते कालपर्यंत बाहेर. टॉप ५ कंटेस्टंट…” अजून पुढे काय झालं ? हा वाद कुठवर गेला जाणून घेण्यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.