मीनल तुस्सी ग्रेट हो, मीराच्या सांगण्यावरुन टास्कसाठी करणार होती टक्कल, होतोय कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 16:27 IST2021-10-29T16:24:36+5:302021-10-29T16:27:44+5:30

टास्कमध्ये मीरा राक्षस बनली होती तर मीनल देवदूत होती. मीराने मीनलला टास्कमधून बाहेर काढण्यासाठी नको नको त्या शक्कल वापरल्या. मीराने विचित्र टास्क मीनलला दिला.

Bigg Boss Marathi 3: Minal Shah You are Great! Viewers appreciate her being ready tocommitment of task of getting hair cut in House | मीनल तुस्सी ग्रेट हो, मीराच्या सांगण्यावरुन टास्कसाठी करणार होती टक्कल, होतोय कौतुकाचा वर्षाव

मीनल तुस्सी ग्रेट हो, मीराच्या सांगण्यावरुन टास्कसाठी करणार होती टक्कल, होतोय कौतुकाचा वर्षाव

बिग बॉस मराठी शो आणि वाद हे जणू समीकरणच बनले आहे. गेल्या दोन्ही सीझनपासून सुरु असलेली वादाची परंपरा यंदाही कायम आहे. बिग बॉस मराठी सीझन ३ सुरु होताच बिग बॉसमध्ये स्पर्धकांमध्ये  वाद रंगायला सुरु झाली. घरात स्पर्धकांमध्ये टास्कदरम्यान असणारी चढाओढ कायमच पाहायला मिळते.क्वचितच टास्कमध्ये स्पर्धक असे काही काम करुन जातात ज्यामुळे रसिकही त्यांचे तोंडभरुन कौतुक करताना दिसतात. यंदाच्या सिझनमध्ये सगळेच स्पर्धक वाद करण्यात, स्वतःला सिद्ध करण्यात मग्न असताना मिनल शाह मात्र भाव खावून गेली. नुकत्याच संयमाची ऐशी तैशी हा टास्क पार पडला. यावेळी एका स्पर्धकाकडून दुस-या स्पर्धकाला मिळणारे टास्क पूर्ण करायचे धाडस करुन दाखवायचे होते. 

टास्कमध्ये मीरा राक्षस बनली होती तर मीनल देवदूत होती. मीराने मीनलला टास्कमधून बाहेर काढण्यासाठी नको नको त्या शक्कल वापरल्या.  मीराने विचित्र टास्क मीनलला दिला. ट्रीमरने सगळे केस काढून टक्कल करायचं असं मीराने मीनलला सांगितलं. यावर बिनधास्तपण मीनलने मीराकडून मिळालेला टास्क पूर्ण करायचे धाडस दाखवले. नकार न देता टक्कल करायला ती तयार झाली. मीनल टक्कल करणार तितक्याच मीराने तिला रोखले.टास्क जरी पूर्ण झाला नसला तरी मीनलने उचलेल्या धाडसी पाऊलने रसिकांची मनं जिंकली आहेत. तू एकटी तिथे सगळ्यांवर भारी पडतेस,मीनल तू ग्रेट आहेस., जिंकलंस पोरी, उत्कृष्ट कामगिरी बघून सोशल मीडियावर रसिक तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. कमेंट्स लाईक्स देत असल्यामुळे मीनल आता रसिकांची आवडती स्पर्धक बनली आहे. 

तर दुसरीकडे मीरा जगतापवर रसिकांचा चांगला संताप होत आहे. मीराने मीनलला दिलेले टास्क योग्य नसल्याचे म्हणत तिच्यावर निशाणा साधत असल्याचे पाहायला मिळत आहे. एका मुलीने दुस-या मुलीला टक्कर कर म्हणून सांगणे अजिबात योग्य नाही. मीराचे असे वागणे खटकल्याचे पाहायला मिळत आहे.मीराने मीनलसाठी आखलेली खेळी तिच्यावर पालटल्याचे पाहायला मिळत आहे. 

 

Web Title: Bigg Boss Marathi 3: Minal Shah You are Great! Viewers appreciate her being ready tocommitment of task of getting hair cut in House