Bigg Boss Marathi 3 :'खेळेन तर एकटीच नाहीतर गेम सोडेन' - गायत्री दातार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 20:16 IST2021-11-02T20:15:50+5:302021-11-02T20:16:11+5:30

Bigg Boss Marathi 3 :'बिग बॉस ३' मधील सर्वच स्पर्धक ताकदीचे आहेत. आता गायत्री दातारही तगडी झुंज देताना दिसत आहे.

Bigg Boss Marathi 3: 'If I play alone, I will leave the game' - Gayatri Datar | Bigg Boss Marathi 3 :'खेळेन तर एकटीच नाहीतर गेम सोडेन' - गायत्री दातार

Bigg Boss Marathi 3 :'खेळेन तर एकटीच नाहीतर गेम सोडेन' - गायत्री दातार

'बिग बॉस मराठी ३'च्या घरातील स्पर्धा दिवसेंदिवस अधिकच आव्हानात्मक होऊ लागली आहे. 'बिग बॉस ३' मधील सर्वच स्पर्धक ताकदीचे आहेत. आता गायत्री दातारही तगडी झुंज देताना दिसत आहे. स्पर्धकांचे चाहते त्यांना ‘चुगली बूथ’च्या माध्यमातून उत्तम खेळण्यास मदत करत आहेत. तसेच त्यांना योग्य तो सल्ला देऊन सावधही करत आहेत. गायत्रीही उत्तम खेळताना दिसत आहे. तिच्या खेळण्यावर बाकीच्या स्पर्धकांच्या सूचनांचा प्रभाव होत असल्याचे तिच्या चाहत्यांनी ‘चुगली बुथ’च्या माध्यमातून तिला सांगितले.

 'बिगबॉस 3'चे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनीही अगोदर दुसऱ्यांच्या विचारांनी प्रभावित न होता स्वतःचा खेळ खेळण्याचे गायत्रीला सांगितले होते. याचा तिने गांभीर्याने विचार केला असता ही गोष्ट तिच्याही लक्षात आली. स्वतःचे मत असूनही दुसऱ्यांच्या बोलण्याचा आपल्या निर्णयांवर, खेळावर परिणाम होऊ शकतो, हे आता तिच्या लक्षात आले आहे. आता कोणाच्याही बोलण्याचा स्वतःवर प्रभाव होऊ न देता,  कुणाचेही न ऐकता फक्त स्वतःच्या विचारांनी खेळण्याचे तिने ठरवले आहे. यामुळे गायत्री दातारची पुढील खेळी पाहणे उत्साहाचे ठरणार आहे. गायत्रीच्या या निर्णयामुळे गायत्री, मीरा, जय या त्रिकुटाची मैत्री यापुढे अशीच राहणार का? असा प्रश्नही प्रेक्षकांना पडला आहे.

मोठी संधी हुकली..
बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेण्यापूर्वी बाबू या मराठी सिनेमाची गायत्री दातारला ऑफर मिळाली होती.अभिनेता अंकित मोहन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अंकित मोहन सोबत अभिनेत्री गायत्री दातार आणि रुचिरा जाधव झळकणार होत्या मात्र गायत्री बिग बॉसच्या घरात असल्याने ती या चित्रपटाचे शूटिंग करू शकत नाही. त्यामुळे बाबू चित्रपटात गायत्रीच्या जागी आता अभिनेत्री नेहा महाजन हिची वर्णी लागली आहे.

Web Title: Bigg Boss Marathi 3: 'If I play alone, I will leave the game' - Gayatri Datar