Bigg Boss Marathi 3 : 'त्यापेक्षा मी तुमच्यापासून दूर राहिलेली बरी...', सुरेखा कुडची यांनी जयकडे व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 13:20 IST2021-10-13T13:19:24+5:302021-10-13T13:20:01+5:30
बिग बॉस मराठी ३ शोमध्ये प्रसारीत झालेल्या भागात सुरेखा कुडची सदस्यांवर थोड्या नाराज असल्याचे दिसून येत आहे.

Bigg Boss Marathi 3 : 'त्यापेक्षा मी तुमच्यापासून दूर राहिलेली बरी...', सुरेखा कुडची यांनी जयकडे व्यक्त केली नाराजी
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन कार्य पार पडले. ज्यामध्ये घरातील पाच सदस्य सुरक्षित झाले आणि बाकी सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले. कालपासूनच सुरेखा कुडची सदस्यांवर थोड्या नाराज असल्याचे दिसून येत आहे. जीपमध्ये बसण्याची संधी कोणत्या सदस्याला मिळेल यावरून टीम घेत असलेल्या निर्णयावर काल सुरेखा ताईंनी नाराजी व्यक्त केली आणि म्हणाल्या तुम्ही जे ठरवाल त्याला मी मत देईन. आज देखील जय त्याविषयीच सुरेखाताईंशी बोलताना दिसणार आहे. तो त्याचा मुद्दा मांडणार आहे.
जयने विचारले, “सुरेखाताई तुम्ही का नाही आलात ? तुम्ही येऊन जरी गेला असता तरी चालले असते. सुरेखा ताईंचे म्हणणे आहे की, “मी तिथे यायचे, तुम्ही मला उतरवणार. त्यापेक्षा मी तुमच्यापासून दूर राहिलेली बरे ना. जय त्यांना मुद्दा समजावण्याचा प्रयत्न करणार आहे, “तुम्ही चुकीचेच बोलत आहात. सुरूवातीला येणे तुमचा भागच नव्हता. तुम्ही विकासला पण विचारा तो जेव्हा आत आला तेव्हा आम्ही डील केले होते याच्यानंतर दादुस येणार आणि नंतर तुम्ही येणार आणि हे डील झाले होते. हवे तर त्याला आता विचारा आणि अजून एक होते तुमच्यानंतर परत तो येणार”.
बघूया पुढे काय होतं ? कोणाचं म्हणण खरं आहे, सुरेखाताई कोणावर विश्वास ठेवणार ? हे आजच्या भागात पहायला मिळणार आहे.