सोनाली अन् मीनललादेखील लागलं 'बादल बरसा बिचुली' चं याड; फॉलो केला ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 04:13 PM2023-07-09T16:13:52+5:302023-07-09T16:14:39+5:30

Sonali patil: या दोघी एकमेकींना भेटतात. त्यावेळी त्या कायम काही तरी हटके करत असतात.

bigg-boss marathi 3 fame sonali patil and meenal shah follow baadal barsa bijuli sawan ko pani trend | सोनाली अन् मीनललादेखील लागलं 'बादल बरसा बिचुली' चं याड; फॉलो केला ट्रेंड

सोनाली अन् मीनललादेखील लागलं 'बादल बरसा बिचुली' चं याड; फॉलो केला ट्रेंड

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी (bigg boss marathi) या वादग्रस्त रिअॅलिटी शोचं तिसरं पर्व तुफान गाजलं. या शोमधील प्रत्येक टास्कप्रमाणेच त्यात सहभागी झालेल्या स्पर्धकांची मैत्रीही चांगलीच चर्चेत राहिली. यात अजूनही अभिनेत्री सोनाली पाटील आणि मीनल शहा यांची सोशल मीडियावर चर्चा रंगते. जेव्हा केव्हा या दोघी एकमेकींना भेटतात. त्यावेळी त्या कायम काही तरी हटके करत असतात. यावेळीदेखील त्यांनी असंच काहीसं केलं आहे.

सोशल मीडियावर दररोज असंख्य ट्रेंड व्हायरल होत असतात. हे ट्रेंड सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण फॉलो करतात. असाच ट्रेंड सोनाली आणि मीनल या दोघींनी फॉलो केला आहे. सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'बादल बरसा बिचुली, सावन का पानी' या गाण्यावर अनेकांनी रिल्स केले आहेत. असाच रिल्स सोनाली आणि मीनलने केला आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून त्याला क्षणार्थात असंख्य लाइक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत.

दरम्यान, मीनल आणि सोनाली यांनी बिग बॉस मराठीमध्ये सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे हा शो संपल्यानंतरही त्यांची मैत्री कायम आहे. बऱ्याचदा या दोघी एकमेकींच्या घरी रहायला जातात. आणि, यावेळच्या त्यांच्या गप्पाटप्पा, डान्स, मस्ती असे कितीतरी व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
 

Web Title: bigg-boss marathi 3 fame sonali patil and meenal shah follow baadal barsa bijuli sawan ko pani trend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.