Bigg Boss Marathi 3 Episodes, 2 oct: गायत्री की जय, कोण होणार कॅप्टन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 15:56 IST2021-10-02T15:56:15+5:302021-10-02T15:56:52+5:30

पहिल्या आठवड्यात बिग बॉसच्या घराचा कॅप्टन होण्याचा मान उत्कर्ष शिंदेला मिळाला होता. आता दुसऱ्या आठवड्यात कॅप्टनपदासाठी जय दुधाणे आणि गायत्री दातार यांच्यापैकी एकाची निवड होणार आहे.

Bigg Boss Marathi 3 Episodes, 2 Oct: Gayatri Ki Jai, Who Will Be Captain? | Bigg Boss Marathi 3 Episodes, 2 oct: गायत्री की जय, कोण होणार कॅप्टन?

Bigg Boss Marathi 3 Episodes, 2 oct: गायत्री की जय, कोण होणार कॅप्टन?

बिग बॉस मराठी हा शो घरातील विचित्र टास्क, वादविवाद आणि प्रेम प्रकरणांमुळे कायमच चर्चेत असतो. आतापर्यंत झालेल्या दोन्ही पर्वामध्ये घरातील वाद आणि प्रेम प्रकरणे खूप गाजली होती. त्यानंतर आता या पर्वातदेखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. नुकतेच बिग बॉसच्या घरात हल्लाबोल या टास्कमध्ये टीम बी वर मात टीम एने विजय मिळवला आहे. त्यामुळे आता घरातील नव्या कॅप्टन्सी टास्कसाठी दोन उमेदवारांमध्ये नवा सामना रंगल्याचे पाहायला मिळणार आहे.

पहिल्या आठवड्यात बिग बॉसच्या घराचा कॅप्टन होण्याचा मान उत्कर्ष शिंदेला मिळाला होता. आता दुसऱ्या आठवड्यात कॅप्टनपदासाठी जय दुधाणे आणि गायत्री दातार यांच्यापैकी एकाची निवड होणार आहे.


बिग बॉसने घरातील स्पर्धकांना पहिल्यांदाच ग्रुप टास्क दिला होता. 'हल्लबोल' या टास्कमध्ये बरेच वाद झाले. अखेर जय आणि गायत्री यांनी टास्कमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे कॅप्टनपद या दोघांपैकी एकाला मिळणार आहे. प्रेक्षक या दोघांपैकी कोण कॅप्टन बनणार आहे, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. 


यंदा बिग बॉसच्या घरात विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाने, सुरेखा कुडची, शिवलीला पाटील, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे यांनी प्रवेश केला आहे.

Web Title: Bigg Boss Marathi 3 Episodes, 2 Oct: Gayatri Ki Jai, Who Will Be Captain?