Bigg Boss Marathi 3, Episodes, 01 Dec : विकासने टीमला केली 'ही' विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 16:28 IST2021-12-01T16:28:11+5:302021-12-01T16:28:49+5:30
Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज खूप दिवसांनी टीम बी एकत्र बसून चर्चा करताना दिसणार आहे.

Bigg Boss Marathi 3, Episodes, 01 Dec : विकासने टीमला केली 'ही' विनंती
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज खूप दिवसांनी टीम बी एकत्र बसून चर्चा करताना दिसणार आहे. ज्यामध्ये एक,दोन दिवसांपासून अजून एक सदस्य भरती झाला आहे आणि ती सदस्य म्हणजे गायत्री दातार. विशाल आणि विकास एकमेकांशी ग्रुपसमोर चर्चा करताना दिसणार आहेत. ज्यामध्ये विकासने ग्रुपला एक विनंती देखील केली आणि त्यानंतर सगळ्यांना हसू फुटले.
विशाल विकासला विचारताना दिसणार आहे, तू मला नॉमिनेट का करायला गेला होतास जयकडे ? विकास त्यावर म्हणाला, कारण तू मला करत होतास. विशाल म्हणाला, मी तुझे नाव सुद्धा घेतले नाहीस. त्यावर विकास म्हणाला, मला जयने सांगितले. मीनल म्हणाली, खोटे बोलतो. विशाल म्हणाला, खोटे बोलायला कुठल्या शाळेत..... विकास म्हणाला, त्याविषयी आपण बोलूया कॅमेरा ऑफ होऊ देत.
पुढचा गेम अवघड होत जाणार - विकास
विशाल म्हणाला, त्यानंतर जयने बॉम्ब टाकला तो मला नॉमिनेट करायला आला... भाऊ बोलायलाच आला नाही परत. त्यावर विकास म्हणाला, आम्ही तीन दिवस वाट बघत होतो तू येशील आमच्याकडे सॉरी बोलायला. विकासचे म्हणणे आहे, इथून पुढचा गेम अवघड होत जाणार आहे, तर कोणालाही नॉमिनेट करा मला नॉमिनेट करू नका... हे ऐकताच सगळ्यांना हसू फुटले. पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी बिग बॉस मराठी ३ चा आजचा एपिसोड पाहावा लागेल.