Bigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वे सांगतेय तिच्या लग्नाच्या प्लानिंगविषयी, वाचा काय सांगतेय लग्न करण्याविषयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 17:45 IST2019-08-20T17:40:56+5:302019-08-20T17:45:34+5:30
वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्या नवीन क्लिपमध्ये नेहा, आरोह आणि शिव हे तिघे शिवानीसोबत तिच्या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहेत.

Bigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वे सांगतेय तिच्या लग्नाच्या प्लानिंगविषयी, वाचा काय सांगतेय लग्न करण्याविषयी
'बिग बॉस मराठी २'ची स्पर्धक शिवानी सुर्वे आपल्या बिनधास्त स्वभावाबद्दल आणि मनमोकळ्या वागण्याबद्दल ओळखली जाते. बिग बॉस घरामध्ये तिच्या पुनरागमनाने निश्चितच उत्साह वाढला आहे. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्या नवीन क्लिपमध्ये नेहा, आरोह आणि शिव हे शिवानीला तिच्या प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी तयार करताना दिसत आहेत.
शिवानी सांगते, ''माझी मम्मी ना नुसती माझ्या मागेच लागलेली असते, 'शिवानी तुला स्थळ आलं आहे ते, त्याचा काय करू मी' म्हणजे तिला असं म्हणायचं असतं नेमकं की, तू सांग ना आता तुझं काय चालू आहे ते आणि मी नको नको त्या स्थळाला आपण नाही म्हणूया हेच करत असते!'' यावर आरोह लगेच सल्ला देत म्हणतो, ''तुझं आता करेक्ट एज आहे शिवानी लग्नाचं! काय म्हणतेस नेहा?'
यावर शिवानी प्रत्युत्तर देत म्हणते, ''मला अजून अजिंक्यने लग्नासाठी प्रपोज केलेलं नाहीये!''
याबाबत नेहा तिच्या वयाबाबत चौकशी करत तिला सल्ला देते, ''२४ तुला लागेल ना आता! आहे अजून वर्ष, दीड वर्ष. मी माझ्या अनुभवावरून सांगतेय, पंचविसाव्या वर्षी लग्न केलं तर नंतरच्या गोष्टी सोप्या जातात, जेवढं उशिरा लग्न करशील तेवढं तुला त्या घरात किंवा त्या माणसांबरोबर ॲडजस्ट करायला जमणार नाही!''
शिवानी तिचा सल्ला मान्य करत म्हणते, ''अजिंक्यच्या मम्मी, पप्पांसोबत माझे रिलेशन खूप छान आहे!''
ती पुढे म्हणते, ''माझ्या मम्मी, पप्पांची इच्छा आहे की, त्यांच्या २५व्या ॲनिव्हर्सरीला माझं लग्न व्हावं! जी आता आहे नोव्हेंबरमध्ये, सो इट्स नॉट ॲट ऑल पॉसिबल!''
शिवानीचा प्रियकर अजिंक्य ननावरे हा देखील अभिनेता असून त्याने असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, सख्या रे, गर्ल्स हॉस्टेल यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तू जीवाला गुंतवावे या मालिकेत अजिंक्य आणि शिवानी यांनी एकत्र काम केले होते. याच मालिकेदरम्यान त्या दोघांची चांगली मैत्री झाली आणि काहीच काळात ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.