बिग बॉस मराठी २ : बिग बॉसच्या घरात एन्ट्री करताच शिवानीला खटकली ही गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 18:32 IST2019-07-15T18:32:07+5:302019-07-15T18:32:33+5:30
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अचानक शिवानीच्या एन्ट्रीने सगळ्याच सदस्यांना धक्का बसला.

बिग बॉस मराठी २ : बिग बॉसच्या घरात एन्ट्री करताच शिवानीला खटकली ही गोष्ट
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अचानक शिवानीच्या एन्ट्रीने सगळ्याच सदस्यांना धक्का बसला. बिग बॉस काहीही करू शकतात, आणि कोणतेही सरप्राईज देतात असे देखील सदस्यांचे म्हणणे पडले.
शिवानी एक उत्तम खेळाडू आहे हे प्रेक्षक आणि सदस्य सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे तिच्या घरात येण्याने काय काय बदल होतील ? हे कळेलच. कोणत्या नव्या युक्त्या रचल्या जातील हे बघणे रंजक असणार आहे.
माधव, नेहा आणि शिवानी एकमेकांसाठी पहिल्यापासूनच खास होते. त्यामुळे घरामध्ये आल्यावरच शिवानीने माधव आणि नेहाला तिच्या मनातील गोष्टी सांगितल्या. तिला एक गोष्ट खटकली आणि ती म्हणजे वीणा आणि शिव तिला नाही भेटले आणि बोलायला देखील नाही आले.
माधवचे म्हणणे पडले, त्यांना आता खूप असुरक्षित वाटायला सुरुवात झाली आहे. त्यांना त्रास होतो आहे. शिवानी म्हणाली, पहिला, दुसरा आणि तिसरा आठवडा सगळ्या आठवड्यांचा बदला घेणार. तो मूर्ख माणूस गेल्यानंतर त्या तिघी बिथरल्या आहेत. वीणा फक्त म्हणते मी स्ट्राँग आहे.
माधवला देखील तिने सांगितले तू जिथे बोलायचे तिथे बोलत नाही. ती वीणा किती बोलते तुम्ही फक्त हाताची घडी घालून बसता, तू चांगल्या पद्धतीने बोल पण बोल. उत्तर न देणं हे उत्तर नाही या घरामध्ये.
आता बघूया घरामध्ये काय होईल ? ग्रुपमध्ये काय बदल होतील ? बिग बॉस मराठी सिझन २ रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर पहा.