बिग बॉस मराठी २ : घरातील ही आहे मॉनिटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 14:49 IST2019-05-31T14:48:11+5:302019-05-31T14:49:07+5:30

बिग बॉसच्या घरामध्ये अभिजित बिचुकले पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिले आहेत. शिवानी सुर्वे आणि अभिजित बिचुकले यांच्यामध्ये देखील बरेच वाद झाले.

Bigg Boss Marathi 2: This is the monitor in the house | बिग बॉस मराठी २ : घरातील ही आहे मॉनिटर

बिग बॉस मराठी २ : घरातील ही आहे मॉनिटर

बिग बॉस मराठी सीझन २ च्या घरामध्ये अजून पहिला आठवडा संपला पण नाही आणि भांडण, वाद, आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. तर एकीकडे मैत्री आणि ग्रुप्स तयार होण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे ज्यांच्यामध्ये कटुता आली आहे त्यांनी ती कटुता विसरून पुन्हा चांगले संबंध कसे होतील या दिशेने प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. बिग बॉसच्या घरामध्ये अभिजित बिचुकले पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिले आहेत. शिवानी सुर्वे आणि अभिजित बिचुकले यांच्यामध्ये देखील बरेच वाद झाले पण, आता शिवानी सुर्वेने चक्क बिचुकले यांना मदत केली... त्यांच्यामधील भांडण आणि वाद विसरून तिने त्यांची मदत करण्याचा पवित्रा हाती घेतला.


शिवानीने त्यांची बॅग, त्यांचे कपडे आवरून ठेवायला सांगितले आणि त्यांची जागा संपूर्ण पणे स्वच्छ करून घेत असताना अभिजित बिचुकले यांनी शिवानीला मॉनिटर असे नाव ठेवले.


 बिग बॉसच्या घरात कालचा दिवस खूप वादग्रस्त आणि भावूक ठरला... विणा आणि नेहाला डोक्यावर अपात्र लिहून आणि गळ्यात पाटी लटकवून घरामध्ये वावरण्यास बिग बॉस यांनी सांगितले. तर काल पराग आणि वैशालीमधील वाद, रुपाली, नेहा आणि अभिजित बिचुकले मधील वाद खूप टोकापर्यंत गेला आणि त्यानंतर रुपाली भाऊक देखील झाली. एकीकडे विणा आणि शिवानीमध्ये बाचाबाची झाली तर दुसरीकडे बिग बॉसच्या घरात KVR ग्रुप तयार झाला. आजचा दिवस जरा हलकाफुलका जाणार आहे.

सगळ्या सदस्यांच्या आजच्या दिवसाची सुरुवात नागिन डान्स या धम्माल गाण्याने होणार आहे. KVR ग्रुपचे बॉनडिंग आणि काय आहे त्यांची इच्छा हे बघायला मिळणार आहे.

बिग बॉसच्या घरात जोपर्यंत लाईट्स बंद होत नाही तोपर्यंत सदस्यांना झोपण्यास सक्त मनाई असते. आज बरेच सदस्य या नियमाचे उल्लंघन करताना दिसणार आहेत. ज्यामुळे घरामध्ये कोंबडा बऱ्याचदा आरवताना ऐकायला मिळणार आहे.

Web Title: Bigg Boss Marathi 2: This is the monitor in the house