Bigg Boss Marathi 2 – केळकर आणि बिचुकलेमध्ये या कारणामुळे रंगला वाद, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 14:06 IST2019-08-05T14:03:07+5:302019-08-05T14:06:57+5:30

या टास्कमध्ये बिग बॉस यांनी सगळ्या सदस्यांना घराचा कॅप्टन होण्याची संधी दिली आहे. त्यामुळे आता ही संधी कोणीच गमवू इछित नाही आणि कॅप्टन होण्यासाठी सगळेच सदस्य जीव तोडून प्रयत्न करणार हे निश्चित.

Bigg Boss Marathi 2 - Kelkar and Abhijeet Bichukle Dispute The Cause, Read The Details | Bigg Boss Marathi 2 – केळकर आणि बिचुकलेमध्ये या कारणामुळे रंगला वाद, वाचा सविस्तर

Bigg Boss Marathi 2 – केळकर आणि बिचुकलेमध्ये या कारणामुळे रंगला वाद, वाचा सविस्तर

बिग बॉसच्या घरातील स्पर्धक सदस्यांचा अंदाज, त्यांच्यातील वाद-विवाद, कधी कधी डोळ्यात तरळणारे अश्रू आणि तितकंच प्रेम यामुळे बिग बॉस मराठी रसिकांना भावतो आहे. आपल्या लाडक्या कलाकारांना बिग बॉसच्या घरात पाहणं रसिकांना भावतंय. दर आठवड्याला विविध टास्क, नॉमिनेशन्स आणि त्यातून निर्माण होणारे तंटे रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.

 


बिग बॉस मराठीच्या घरामध्ये खांब खांब हे कॅप्टनसी कार्य रंगणार आहे. या कार्यामध्ये सदस्यांना खांब पकडून त्याच्यावर त्यांच्या नावाचे स्टीकर चिकटवायचे आहे आणि यावरूनच सदस्यांमध्ये वाद होणार आहेत. आरोह आणि शिवमध्ये देखील याच मुद्यावरून वाद रंगला आहे. या टास्कमध्ये बिग बॉस यांनी सगळ्या सदस्यांना घराचा कॅप्टन होण्याची संधी दिली आहे. त्यामुळे आता ही संधी कोणीच गमवू इछित नाही आणि कॅप्टन होण्यासाठी सगळेच सदस्य जीव तोडून प्रयत्न करणार हे निश्चित. 


याचवेळेस टास्कमध्ये शिवानीने अभिजीत बिचुकले यांनी धरलेल्या खांबाला तिचे नाव चिकटवले. अभिजीत केळकर याचे नाव असलेले स्टीकर तो खांबाला चिकटवण्याआधीच अभिजीत बिचुकले यांनी त्यांचे नाव असलेले स्टीकर अभिजीत केळकर याने पकडलेल्या खांबाला चिकटवले. या कार्याची हीना संचालिका आहे. अभिजीत केळकरचे म्हणणे पडले अस नाही होऊ शकत. त्यावर हीनाने सांगितले मी आधीच सांगितले होते. ज्याच्या नावाचे स्टीकर मला खांबावर आधी दिसेल ते ग्राह्य पकडले जाईल.

Web Title: Bigg Boss Marathi 2 - Kelkar and Abhijeet Bichukle Dispute The Cause, Read The Details