Bigg Boss Marathi 2 : हिना पांचाळची बहिणदेखील आहे तिच्या इतकीच बोल्ड, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 13:22 IST2019-08-03T13:21:27+5:302019-08-03T13:22:03+5:30

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्री आणि आयटम गर्ल हिना पांचाळ हिने वाइल्ड कार्ड एन्ट्री केली आणि या शोच्या माध्यमातून ती घराघरात पोहचली.

Bigg Boss Marathi 2: Hina Panchal's sister is as bold as her, see her photo | Bigg Boss Marathi 2 : हिना पांचाळची बहिणदेखील आहे तिच्या इतकीच बोल्ड, पहा तिचे फोटो

Bigg Boss Marathi 2 : हिना पांचाळची बहिणदेखील आहे तिच्या इतकीच बोल्ड, पहा तिचे फोटो

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्री आणि आयटम गर्ल हिना पांचाळ हिने वाइल्ड कार्ड एन्ट्री केली आणि या शोच्या माध्यमातून ती घराघरात पोहचली.

 

हिना बिग बॉसच्या घरात टास्क पूर्ण करते. तसेच तिचा घरात सगळ्या गोष्टीत सहभाग असतो. बऱ्याचदा तिची वीणा, शिवानी व रुपाली यांच्यासोबत वादावादी होताना पहायला मिळते. 

हिनाने नुकताच तिच्या वडीलांचा व बहिणीचा फोटो शेअर केला आहे. तिच्या बहिणीचं नाव दिपाली पांचाळ असून ती देखील हिना इतकीच बोल्ड आहे. हे तिच्या सोशल मीडियावरील फोटोतून पहायला मिळतं.

हिना पांचाळ ही दाक्षिणात्य बोल्ड अभिनेत्री आहे. पण खास बात म्हणजे, हिनाचा चेहरा बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी मिळताजुळता आहे. त्यामुळे मलायकाची ‘Look-Alike’ म्हणून हिना ओळखली जाते.

हिनाने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली.

हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे.

विशेष म्हणजे २०१५ च्या फोर्ब्स इंडियाच्या १०० सेलिब्रिटाच्या यादीत हिनाचा  समावेश होता.

हिना सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव असते. स्वत:चे बोल्ड फोटो ती शेअर करत असते.

Web Title: Bigg Boss Marathi 2: Hina Panchal's sister is as bold as her, see her photo