बिग बॉस मराठी 2: बिग बॉसच्या घरात रंगणार आज 'हा' इंटरेस्टिंग टास्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 14:53 IST2019-05-28T14:40:20+5:302019-05-28T14:53:52+5:30

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज देखील बऱ्याच विषयांवर चर्चा आणि वाद रंगताना दिसणार आहे. सदस्यांनी सहमताने चार अपात्र सदस्यांची नावे बिग बॉसना सांगितली

Bigg boss marathi 2 : first nomination round will be done in bigg boss house | बिग बॉस मराठी 2: बिग बॉसच्या घरात रंगणार आज 'हा' इंटरेस्टिंग टास्क

बिग बॉस मराठी 2: बिग बॉसच्या घरात रंगणार आज 'हा' इंटरेस्टिंग टास्क

ठळक मुद्देवैशाली आणि अभिजित यांना नशिबाने साथ दिली कि नाही हे आजच्या भागामध्ये कळणार आहे. पराग आणि विणा यांच्यामध्ये नेहा शितोळेबद्दल चर्चा रंगणार आहे

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज देखील बऱ्याच विषयांवर चर्चा आणि वाद रंगताना दिसणार आहे. तसेच काल पार पडलेल्या भागामध्ये सदस्यांनी सहमताने चार अपात्र सदस्यांची नावे बिग बॉसना सांगितली. ज्यामध्ये अभिजित बिचुकले, मैथिली जावकर, वैशाली माडे आणि शिव ठाकरे यांचा समावेश होता. या प्रक्रियेमध्ये बिग बॉस यांनी चारही सदस्यांना अॅक्टिव्हीटी एरियामध्ये बोलावले... शिवने त्याच्यासमोर ठेवलेले पाकीट उघडला आणि त्यामध्ये नॉमिनेटेड असे लिहिले होते त्यामुळे शिव घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये थेट नॉमिनेट झाला, तर मैथिलीच्या पाकिटामध्ये काहीही लिहिलेले नसल्याने ती बिग बॉसच्या घरामध्ये राहाण्यास पात्र ठरली. तर वैशाली आणि अभिजित यांना नशिबाने साथ दिली कि नाही हे आजच्या भागामध्ये कळणार आहे.

आजच्या भागामध्ये घरातील काही सदस्य अभिजित बिचुकलेबद्दल बोलताना दिसणार आहे... तर पराग आणि विणा यांच्यामध्ये नेहा शितोळेबद्दल चर्चा रंगणार आहे. दुसरीकडे शिवानी नेहाला अभिजित बिचुकले आणि रुपाली भोसले यांच्यामध्ये झालेला किस्सा सविस्तर सांगणार आहे. माधव देवचक्के आणि अभिजित बिचुकले यांच्यामध्ये मोठी चर्चा रंगणार आहे.

तर दुसरीकडे बिग बॉस नॉमिनेशन प्रक्रियायेसाठी एक टास्क घोषित करणार आहेत. ज्यामध्ये टीम अभिजित बिचुकले आणि वैशाली म्हाडे या टीम मध्ये सिझन २ चा पहिला नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. आता सदस्य कुणाला सुरक्षित करणार ? घरामध्ये ग्रुप पडणार का ? कोण कोणाच्या टीम मध्ये जाणार ? हे बघणे रंजक असणार आहे. 

Web Title: Bigg boss marathi 2 : first nomination round will be done in bigg boss house