बिग बॉस मराठीतील ही स्पर्धक या कारणामुळे सोशल मीडियावर झाली ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 06:30 IST2019-08-17T06:30:00+5:302019-08-17T06:30:01+5:30

बिग बॉस मराठीमधील काही सेलिब्रेटींचे तर फॅन क्लब तयार झाले असून आपला आवडता सेलिब्रेटी जिंकावा यासाठी त्यांचे फॅन्स प्रयत्न करत आहे.

bigg boss marathi 2 contestant Neha Shitole trending on Social Media | बिग बॉस मराठीतील ही स्पर्धक या कारणामुळे सोशल मीडियावर झाली ट्रेंड

बिग बॉस मराठीतील ही स्पर्धक या कारणामुळे सोशल मीडियावर झाली ट्रेंड

ठळक मुद्देबिग बॉस मराठीच्या घरातील नेहाचा वावर आणि तिच्या स्ट्रॅटेजीस पाहता, घराबाहेर तिचे लाखो चाहते बनले आहेत. इतकेच नव्हे तर घरातल्या सदस्यांना देखील ती आवडू लागली आहे आणि याचमुळे सोशल मीडियावर #NehaWinningHearts हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंड झाला आहे.

'बिग बॉस मराठी २' या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून या घरातील सगळेच स्पर्धक आता प्रेक्षकांचे प्रचंड आवडते बनले आहेत. या कार्यक्रमात यंदाच्या आठवड्यात अभिजीत केळकर घराच्या बाहेर पडला असून सध्या घरात असलेल्या स्पर्धकांपैकी कोण स्पर्धक विजेता ठरणार याचा प्रत्येकजण अंदाज लावत आहे. काही सेलिब्रेटींचे तर या कार्यक्रमामुळे फॅन क्लब तयार झाले असून आपला आवडता सेलिब्रेटी जिंकावा यासाठी त्यांचे फॅन्स प्रयत्न करत आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात आपल्याला नेहा शितोळेला सध्या पाहायला मिळत असून या कार्यक्रमामुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. नेहा शितोळेचे सोशल मीडियावर सध्या चांगलेच कौतुक होत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील तिचा वावर आणि तिच्या स्ट्रॅटेजीस पाहता, घराबाहेर तिचे लाखो चाहते बनले आहेत. इतकेच नव्हे तर घरातल्या सदस्यांना देखील ती आवडू लागली आहे आणि याचमुळे सोशल मीडियावर #NehaWinningHearts हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंड झालेला पाहायला मिळत आहे. 

ट्विटरवर या हॅशटॅगची मोठी हवा झाली असून या हॅशटॅगच्या संदर्भात सोशल मीडियावर आतापर्यंत १५.७ हजाराहून अधिक पोस्ट शेअर केल्या आहेत. नेहा शितोळेच्या वाढत्या प्रसिद्धीचा हा पुरावा असून याद्वारे तिने बिग बॉस मराठी सीजन २ च्या ट्रॉफीवर आपली प्रबळ दावेदारी सिद्ध केली आहे.

नेहाने रेडीमिक्स, सुर सपाटा, पोस्टर गर्ल यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्स या प्रसिद्ध वेबसिरिजमध्ये ती काटेकरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. दुसऱ्या सिझनमधील तिचे काम देखील प्रेक्षकांना चांगलेच आवडत आहे. नेहाला बिग बॉसमुळे तर सध्या चांगलेच फॅन फॉलोव्हिंग मिळाले आहे. नेहाचे लग्न झाले असून तिच्या पतीचे नाव नचिकेत पूर्णपत्रे असून तो प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने कमीने, रॉकी हँडसम, मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर यांसारख्या हिंदी तसेच झिपऱ्या, अस्तू यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

Web Title: bigg boss marathi 2 contestant Neha Shitole trending on Social Media