"बाप्पाच्या कृपेने मी...", मुंबईतल्या घरातील आग दुर्घटनेनंतर शिव ठाकरेने दिली माहिती, म्हणाला-"शॉर्ट सर्किटमुळे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 10:02 IST2025-11-19T09:58:04+5:302025-11-19T10:02:18+5:30
शिव ठाकरेच्या मुंबईतील फ्लॅटला भीषण आग! पोस्ट करत दिली अपडेट, म्हणाला-"बाप्पाच्या कृपेने मी..."

"बाप्पाच्या कृपेने मी...", मुंबईतल्या घरातील आग दुर्घटनेनंतर शिव ठाकरेने दिली माहिती, म्हणाला-"शॉर्ट सर्किटमुळे..."
Shiv Thakre Home fire Update: 'बिग बॉस' फेम शिव ठाकरेच्या गोरेगाव येथील घराला काल आग लागल्याने मोठी खळबळ माजली. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. या व्हिडीओंमधून आगीमुळे शिवच्या घराचं मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय. त्यामुळे त्याचे चाहते देखील प्रचंड चिंतेत होते. आता या घटनेबद्दल स्वत: शिवने अपडेट दिली आहे. शिव ठाकरेच्या घरी लागलेली आग नियंत्रणात आली असून, सगळं सुखरूप असल्याची माहिती त्याने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

काल १८ नोव्हेंबरला सकाळी ही घटना घडली. त्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने धाव घेत ही आग आटोक्यात आणली आहे. Kolte Patil Verve या बिल्डिंगमधील शिवच्या ठाकरेच्या घराला आग लागली आहे. या आगीच्या घटनेनंतर शिवने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर करत त्यामध्ये म्हटलंय, "शॉर्ट सर्किटमुळे माझ्या लिव्हिंगरुममध्ये आग लागली. पण, आता परिस्थिती नियंत्रणात आहे. तुमच्या काळजी आणि प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. बाप्पाच्या कृपेने मी पूर्णपणे ठीक आहे आणि सुरक्षित आहे. मला काहीही झालेलं नाही... गणपती बाप्पा मोरया...!" अशा आशयाची पोस्ट अभिनेत्याने शेअर केली आहे. दरम्यान, ही दुर्घटना घडली तेव्हा शिव मुंबईत नव्हता. तो काल रात्रीच मुंबईत परतला.
अनेक रिअॅलिटी शो करून घराघरात पोहोचलेल्या शिव ठाकरेने टीव्ही इंडस्ट्रीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.रोडीज ते बिग बॉस मराठी-हिंदी मध्ये झळकून त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम आणि लोकप्रियता मिळाली.