बिग बॉस फेम शेफाली जरीवालाच्या सासऱ्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 12:20 IST2020-05-28T12:18:53+5:302020-05-28T12:20:14+5:30

शेफालीचा पती प्रसिद्ध टीव्ही अभिनेता पराग त्यागीच्या वडिलांचे निधन झाले आहे.

Bigg Boss fame shefali jariwala's father-in-law dies gda | बिग बॉस फेम शेफाली जरीवालाच्या सासऱ्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

बिग बॉस फेम शेफाली जरीवालाच्या सासऱ्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

बिग बॉस फेम शेफाली जरीवाला हिच्या सासऱ्यांचे निधन झाले आहे. शेफालीचा पती प्रसिद्ध टीव्ही अभिनेता पराग त्यागीच्या वडिलांचे निधन झाले आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.  पराग आणि शेफाली मुंबईतून फ्लाईट पकडून दिल्लीला पोहोचले आहेत. परागचे कुटुंबीय गाजियाबादमधील मोदीनगर परिसरात रहाते.   


हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार गेल्या अनेक दिवसांपासून परागचे वडील आजारी होते. लॉकडाऊनमुळे परागचा भाऊ ऑस्ट्रेलियातून येऊ शकला नाही. त्यामुळे सर्व जबाबादारी परागने पार पाडली. रिपोर्टनुसार परागने सांगितले, हो, गेल्या काही दिवसांपसाून त्यांच्या तब्येत ठीक नव्हती. सोमवारी त्यांचे निधन झाले. डायलिसिससाठी जात असताना रस्त्यात त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. माझी पत्नी शेफाली आणि मी घरी पोहोचलो आहेत. जर फ्लाईट सुरु झाल्या नसत्या तर आम्हाला रस्त्याच्या मार्गाने यावा लागले असते. 

परागने पवित्र रिश्ता,  'ब्रह्मराक्षस', 'काला टीका' आणि 'अघोरी' सारख्या लोकप्रिय मालिकेमध्ये काम केले आहे. याशिवाय 'ए वेडनेसडे', 'सरकार 3' आणि 'रूलर' सारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. 

Web Title: Bigg Boss fame shefali jariwala's father-in-law dies gda