'बिग बॉस' फेम अनिल थत्ते यांना झाली कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 10:10 AM2020-07-04T10:10:36+5:302020-07-04T10:11:05+5:30

बिग बॉस मराठी फेम अनिल थत्ते यांना कोरोनाची लागण झाली असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

'Bigg Boss' fame Anil Thatte contracted corona and was admitted to hospital | 'बिग बॉस' फेम अनिल थत्ते यांना झाली कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

'बिग बॉस' फेम अनिल थत्ते यांना झाली कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

googlenewsNext

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. तसेच देशातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात कित्येक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात कोरोनाची लागण काही कलाकारांना झाल्याचंही समोर आले आहे. आता बिग बॉस मराठी फेम अनिल थत्ते यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे. खुद्द अनिल थत्ते यांनीच एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली.

अनिल थत्ते यांनी व्हिडिओतून सांगितले की, सध्या मी रुग्णालयात असून मला कोरोनाची लागण झाली आहे. गेले अनेक दिवस कोरोनाची लागण होऊ नये यासाठी मी वर्क फ्रॉम होम करत होतो. मात्र आज तो व्हायचा तेव्हा होणार तेव्हा होतोच या निष्कर्षाला मी आलो. एवढी काळजी घेऊनही जर कोरोना होणार असेल तर काय म्हणायचं. आता कोरोनाची भीती संपली. तसेच कोरोना सोबत डायबिटीज वगैरे अन्य आजार असूनही प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आजारातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर प्लाझ्मा देण्याचाही संकल्प केला असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.


देशात गुरुवारी प्रथमच कोरोनाचे २० हजार ९०३ रुग्ण आढळून आले असून, त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ६ लाख २५ हजार ५४४ झाला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा व कर्नाटक या पाच राज्यांमध्ये २४ तासांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली.

या २४ तासांत महाराष्ट्रात ६३२८, तामिळनाडूमध्ये ४३४३, दिल्लीमध्ये २३७३, कर्नाटकात १५०२ तर तेलंगणामध्ये १२१३ जणांना बाधा झाल्याचे आढळले. आंध्रात रुग्णांची संख्या ८४५ ने वाढली. या सहा राज्यांतील रुग्णांची संख्या १७ हजारांच्या आसपास आहे. या सर्व राज्यांमध्ये बाधितांची संख्या १५ हजार वा त्याहून अधिक आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १ लाख ८६ हजार ६२६ झाली आहे.

Web Title: 'Bigg Boss' fame Anil Thatte contracted corona and was admitted to hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.