Bigg Boss 13 : सिद्धार्थ शुक्लाची पोलखोल; वाहिनीच्या कर्मचारीने केला ट्विटद्वारे खुलासा !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 18:28 IST2020-02-16T18:22:01+5:302020-02-16T18:28:35+5:30

वाहिनीच्या क्रिएटिव्ह विभाग मध्ये चांगला अनुभव आला. पण, आता मी इथून पुढे या खोटेपणाचा भाग असू शकत नाही. सिद्धार्थ शुक्लाला कमी वोट्स मिळूनही तो जिंकतो, यात नक्कीच काहीतरी चुकीचे आहे, याचा अंदाज प्रेक्षकांनाही आला होता.

Bigg Boss 2: Siddhartha Shukla's Polkhol; Disclosure by Vital Staff by Kayla Testitt !! | Bigg Boss 13 : सिद्धार्थ शुक्लाची पोलखोल; वाहिनीच्या कर्मचारीने केला ट्विटद्वारे खुलासा !!

Bigg Boss 13 : सिद्धार्थ शुक्लाची पोलखोल; वाहिनीच्या कर्मचारीने केला ट्विटद्वारे खुलासा !!

 बिग बॉस १३ या वादग्रस्त हिंदी रिअ‍ॅलिटी शोचा विजेता बनल्यानंतर टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लावर बरीच टीका झाली. सोशल मीडियावर तर शो आणि हा निर्णय फिक्स्ड असल्याचा आरोप सुरू आहे. बिग बॉसचा शो स्क्रिप्टेड असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. आता मात्र एक नवी माहिती मिळतेय. ती म्हणजे, कलर्स वाहिनीच्या एका महिला कर्मचाऱ्याने नुकतीच नोकरी सोडली असून तिने टिवट करून सिद्धार्थच्या विजेता बनण्यामागचे गुपित सोशल मीडियावर शेअर केले आहे. 

कलर्स वाहिनीची एक्स कर्मचारी फेरिया सांगते,‘वाहिनीच्या क्रिएटिव्ह विभाग मध्ये चांगला अनुभव आला. पण, आता मी इथून पुढे या खोटेपणाचा भाग असू शकत नाही. सिद्धार्थ शुक्लाला कमी वोट्स मिळूनही तो जिंकतो, यात नक्कीच काहीतरी चुकीचे आहे, याचा अंदाज प्रेक्षकांनाही आला होता. अशा खोट्या शोचा मी हिस्सा होऊ शकत नाही.’ ती पुढे सांगते,‘ हा शो स्क्रिप्टेड आहे. ज्यात सिद्धार्थ शुक्ला हा फिक्स्ड विनर आहे. ‘बिग बॉस १३’ ची क्रिएटिव्ह आणि प्रोग्रामिंग हेड ही सिद्धार्थ शुक्लाची एक्स गर्लफ्रेंड आहे. त्यामुळे हे जेतेपद साहजिकच सिद्धार्थला मिळाले.’ या टिवटवर तिला प्रेक्षकांचे अनेक लाईक्स, कमेंटस मिळाले. 

या प्रकरणावर प्रियांका चोप्राची बहीण मीरा चोप्रा हिने फेरियाचे कौतुकच केले आहे. मीरा म्हणते,‘ अंतर्गत सुत्रांमुळे आम्हाला काही गोष्टी माहित होत्या. पण, इतर स्पर्धकांवर अन्याय झाला. याशिवाय टीव्हीच्या इतरही कलाकारांनी सिद्धार्थ शो जिंकल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री किश्वर मर्चंट म्हणते,‘ या सगळयांवर अजूनही विश्वास बसत नाही. पारसने पैसे घेऊन शो सोडला. आसिम आणि सिद्धार्थ शोच्या टॉप दोनमध्ये गेले आणि त्या स्पर्धकाने शो जिंकला, ज्याच्यात जिंकण्याची क्षमताच नाही. गौहर खाननेही प्रतिक्रिया दिली, ‘खरंतर जे गुण एका विजेत्यात असायला हवेत ते आसिममध्ये होते. बिग बॉसमध्ये त्यांचा प्रवास हाच त्यासाठीचा पुरावा आहे.’

Web Title: Bigg Boss 2: Siddhartha Shukla's Polkhol; Disclosure by Vital Staff by Kayla Testitt !!