"भांडण, वादविवाद करताना..." 'बिग बॉस'च्या घरात प्रणित मोरेच्या खेळाबद्दल शिव ठाकरेची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 10:59 IST2025-10-19T10:58:28+5:302025-10-19T10:59:05+5:30
प्रणीत मोरेच्या खेळाबद्दल 'बिग बॉस मराठी'चा विजेता शिव ठाकरेनं प्रतिक्रिया दिली.

"भांडण, वादविवाद करताना..." 'बिग बॉस'च्या घरात प्रणित मोरेच्या खेळाबद्दल शिव ठाकरेची प्रतिक्रिया
Bigg Boss : टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस १९'चं (Bigg Boss 19) यंदाचं पर्व खऱ्या अर्थाने खास आहे. या पर्वात सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाचा आतापर्यंत एक वेगवेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. यंदाच्या पर्वात मराठी कॉमेडियन प्रणित मोरेदेखील सहभागी झालेला आहे. 'बिग बॉस'च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून प्रणित प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. प्रणितचं बिग बॉसच्या घरातील वागणं त्यांच्या चाहत्यांना पसंत पडतयं. प्रणीतच्या खेळाचं आतापर्यंत अनेकांनी कौतुक केलंय. अशातच 'बिग बॉस मराठी'चा विजेता शिव ठाकरेनं सुद्धा त्याचं कौतुक केलं आहे.
नुकताच, शिव ठाकरेने एका मुलाखतीत 'बिग बॉस १९' मधील स्पर्धकांबद्दल प्रतिक्रिया दिली आणि यावेळी त्याने त्याच्या काही खास मित्रांच्या खेळाचं कौतुक केलं. 'Telly Masala' ला दिलेल्या मुलाखतीत शिव ठाकरे हा बसीर अली आणि प्रणीत यांच्याबद्दल मनमोकळेपणाने बोलला. शिव म्हणाला, "बसीर अली आणि प्रणीत माझे जवळचे मित्र आहेत. बसीर माझ्याबरोबर 'रोडीज' या शोमध्ये होता आणि प्रणीत तर माझा भाऊ आहे. तो खूपच चांगला खेळ खेळत आहे".
या स्पर्धकांचा खेळही आवडला
बसीर आणि प्रणीत यांच्याशिवाय शिवने इतर काही स्पर्धकांच्या खेळाचंही कौतुक केलं आहे. त्याने अभिषेक आणि अश्नूर कौर यांच्या खेळाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली. शिव म्हणाला, "अभिषेकसुद्धा चांगला खेळत आहे. अश्नूर कौरदेखील चांगली खेळत आहे. हे लोक भांडण, वादविवाद करताना कोणतीच मर्यादा ओलांडत नाहीयेत". याव्यतिरिक्त, अभिषेक बजाज आणि प्रणीत यांचा ग्रुप त्याला आवडत असल्याचेही शिवने स्पष्ट केले.
दरम्यान, प्रणित सोशल मीडिया, युट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर विशेष लोकप्रिय आहे. त्याच्या स्टँडअप कॉमेडीच्या शोंनादेखील विशेष गर्दी होते. त्याने यापूर्वी रेडिओ जॉकी म्हणूनही काम केले होते. 'बिग बॉस १९'बद्दल बोलायचं झाल्यास आतापर्यंत घरातून आवेज दरबार, नगमा मिराजकर, नतालिया आणि जीशान कादरी हे तीन सदस्य बेघर झालेत. तर अभिनेत्री शहनाज गिलचा भाऊ शहबाज बदेशा आणि स्टार क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालती चहर यांनी वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतलेली आहे. 'बिग बॉस १९' मध्ये दर आठवड्याला काही ना काही नवीन ट्विस्ट येत असतात. त्यामुळे प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन होतं.