Bigg Boss 17 : अंकिताशी सतत भांडण करणाऱ्या विकीला आईने चांगलंच सुनावलं, म्हणाल्या, "तुम्ही दोघं घरात..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 11:17 AM2023-11-25T11:17:31+5:302023-11-25T11:18:02+5:30

'बिग बॉस'च्या येणाऱ्या भागात अंकिता आणि विकीची आई दिसणार आहेत. याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

bigg boss 17 vicky jain mother said him not to fight with ankita lokhande video | Bigg Boss 17 : अंकिताशी सतत भांडण करणाऱ्या विकीला आईने चांगलंच सुनावलं, म्हणाल्या, "तुम्ही दोघं घरात..."

Bigg Boss 17 : अंकिताशी सतत भांडण करणाऱ्या विकीला आईने चांगलंच सुनावलं, म्हणाल्या, "तुम्ही दोघं घरात..."

'बिग बॉस १७' दिवसेंदिवस अधिक रंजक होत चाललं आहे. या शोमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहरे बनले आहेत. पण, पतीबरोबर 'बिग बॉस'च्या घरात दिमाखात एन्ट्री घेतल्यानंतर मात्र अंकिता आणि विकीमध्ये खटके उडाल्याचं पाहायला मिळालं. अंकिता आणि विकीमध्ये वारंवार छोट्या छोट्या गोष्टींवरुन वाद होत असल्याचंही दिसत आहे. 'बिग बॉस'च्या येणाऱ्या भागात अंकिता आणि विकीची आई दिसणार आहेत. याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

या व्हिडिओत अंकिता आणि विकीची आई शोमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांना पाहून दोघेही भावुक झाल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर आई आणि सासूला पाहून अंकिता म्हणते, "मिस यू मम्मा...मिस यू अम्मा". 'बिग बॉस'च्या घरात वाद घालण्यावरुन विकीची आई त्याला सुनावते. अंकिता आणि विकी दोघांनाही त्याची आई बिग बॉसच्या घरात भांडण करण्यावरुन म्हणते, "तुम्ही दोघं घरी कधीच भांडला नाहीत. आणि इकडे किती भांडण करताय. एकमेकांबद्दल प्रेम दाखवा." 

दरम्यान, विकीने पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस'च्या घरात त्याचा खेळ खेळायला सुरुवात केली होती. 'बिग बॉस'च्या घरात टिकून राहण्यासाठी तो अनेक युक्त्या लढवत आहे. सेलिब्रिटींचा फेव्हरेट असलेला ऑरी लवकरच 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेणार आहे. त्यामुळे  हा शो अधिकच रंगत होत चालला आहे. 
 

Web Title: bigg boss 17 vicky jain mother said him not to fight with ankita lokhande video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.