Bigg Boss 17 : कपल्समध्ये कटुता! अंकिता-विकी आणि ऐश्वर्या-नीलमध्ये होणार वाद, प्रोमो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 11:03 AM2023-10-18T11:03:35+5:302023-10-18T11:04:13+5:30

Bigg Boss 17 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसच्या १७व्या सीझनला नुकतीच सुरुवात झाली आहे. आता पहिल्याच टास्कदरम्यान कपल्समध्ये कटुता येताना दिसणार आहे. हे बिग बॉस १७च्या प्रोमोत पाहायला मिळत आहे.

Bigg Boss 17: Bitterness in couples! Ankita-Vicky and Aishwarya-Neil will fight, promo viral | Bigg Boss 17 : कपल्समध्ये कटुता! अंकिता-विकी आणि ऐश्वर्या-नीलमध्ये होणार वाद, प्रोमो व्हायरल

Bigg Boss 17 : कपल्समध्ये कटुता! अंकिता-विकी आणि ऐश्वर्या-नीलमध्ये होणार वाद, प्रोमो व्हायरल

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसच्या १७व्या सीझनला नुकतीच सुरुवात झाली आहे. आगामी भागात काय होणार, यंदाच्या सीझनमध्ये कोणतं जोडपं लोकप्रिय आहे आणि पहिला टास्क काय असणार, हे सर्व जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. आता पहिल्याच टास्कदरम्यान कपल्समध्ये कटुता येताना दिसणार आहे. हे बिग बॉस १७च्या प्रोमोत पाहायला मिळत आहे.

बिग बॉस १७च्या प्रोमोत पाहायला मिळतंय की, एकीकडे बिग बॉस ऐश्वर्या शर्मा आणि नील भटला समजावताना दिसत आहे तर दुसरीकडे अंकिता लोखंडे रडताना दिसते आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 


द खबरीच्या एक्स पेजवर बिग बॉस १७चा आगामी एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. ज्याची सुरुवात ऐश्वर्या शर्मा आणि नील भटपासून होते. तर नील रागात दिसतो. तर ऐश्वर्या घरात त्रस्त झाल्याचे सांगताना दिसत आहे. तर अंकिता लोखंडे पती विकी जैनला म्हणते की, तिला कोणत्या गोष्टीचा फरक पडत नाही हा प्रोमो पाहिल्यानंतर चाहतेदेखील आगामी भागासाठी खूप उत्सुक झाले आहेत. 
बिग बॉस १७मध्ये यंदा दोन जोडप्यांची एन्ट्री झाली आहे. यात अंकिता लोखंडे-विकी जैन आणि ऐश्वर्या शर्मा-नील भटचा समावेश आहे. या जोडप्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता चाहते त्यांची घरातील खेळी पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Web Title: Bigg Boss 17: Bitterness in couples! Ankita-Vicky and Aishwarya-Neil will fight, promo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.