Bigg Boss 16: निम्रत कौर नॅशनल टीव्हीवर वडिलांशी भांडली अन् मग ढसाढसा रडली, पाहा प्रोमो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 12:22 IST2023-01-11T12:19:10+5:302023-01-11T12:22:54+5:30
Bigg Boss 16 Promo : निम्रतचे वडील गुरदीप सिंह ‘बिग बॉस 16’च्या घरात आलेत आणि लेकीला पाहताच भावुक झालेत. येताच त्यांनी निम्रतला मिठी मारली. पण फक्त इतकंच नाही तर यानंतरही बरंच काही घडलं.

Bigg Boss 16: निम्रत कौर नॅशनल टीव्हीवर वडिलांशी भांडली अन् मग ढसाढसा रडली, पाहा प्रोमो
Bigg Boss 16 Promo : टीव्हीवरचा सर्वाधिक वादग्रस्त शो ‘बिग बॉस 16’मध्ये फॅमिली वीक सुरू आहे. प्रत्येक सदस्याच्या कुटुंबातील सदस्य घरात आलेत आणि घरातलं अख्खं वातावरण भावुक झालेलं पाहायला मिळालं. एमसीस्टॅनची आई, शिव ठाकरेची आई, साजिद खानची बहीण फराह खान, अर्चना गौतमचा भाऊ तसेच निम्रत कौर अहलुवालियाच्या (Nimrit Kaur Ahluwalia) वडिलांनीही ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे. निम्रतचे वडील गुरदीप सिंह घरात आलेत आणि लेकीला पाहताच ते भावुक झालेत. येताच त्यांनी निम्रतला मिठी मारली. पण फक्त इतकंच नाही तर यानंतरही बरंच काही घडलं. होय, निम्रत आणि तिच्या वडिलांमध्ये नॅशनल टीव्हीवर भांडण झालं. आगामी एपिसोडमध्ये बापलेकीचं हे भांडण पाहायला मिळणार आहे.
‘बिग बॉस 16’चा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये निम्रत तिच्या वडिलांबरोबर भांडताना दिसत आहे. प्रोमोत वडील निम्रतला एकटीने खेळायचा सल्ला देताना दिसतात. यावेळी साजिद खान व एमसी स्टॅन यांच्यात काय बोलणं झालं हेही ते सांगतात. वेळ आली की निम्रत धोका देईल, असं साजिद एमसी स्टॅनला म्हणाल्याचं ते सांगतात. त्यामुळे तू या मंडलीच्या बाहेर एकटीने खेळ, असा सल्ला ते देतात. मात्र निम्रतला वडिलांचा हा फार काही पटत नाही. वडील सल्ला देत असतानाच ती तिथून जायला निघते.
“इतर आई-वडील आपल्या मुलांना शाबासकीची थाप देतात, कौतुक करतात. पण तुम्ही मला नेहमीच कमी लेखता,”असं ती वडिलांना रडत रडत म्हणते. निम्रत व तिच्या वडिलांचं भांडण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. निम्रत शिव, साजिद, एससी स्टॅन, अब्दू रोजिक या मंडलीबरोबर खेळताना दिसत आहे. यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला वडिलांनी दिला आहे. मात्र निम्रतला वडिलांचा हा सल्ला मानवलेला नाही. आता पुढे काय होतं ते बघूच.