Bigg Boss 16 Grand Finale : शालीन भनोट आऊट, आता उरले फक्त चार; हे आहेत 'बिग बॉस १६'चे टॉप ४ स्पर्धक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 07:05 PM2023-02-12T19:05:03+5:302023-02-12T21:52:30+5:30

Bigg Boss 16 Finale Live Updates: १९ आठवड्यांपूर्वी १७ स्पर्धकांसोबत 'बिग बॉस १६'ची सुरूवात झाली होती. सरतेशेवटी उरले केवळ चार...

Bigg Boss 16 Grand Finale Live Updates Shalin Bhanot out Shiv Thakare Priyanka Chahar Choudhary Shalin Bhanot Archana Gautam Mc Stan | Bigg Boss 16 Grand Finale : शालीन भनोट आऊट, आता उरले फक्त चार; हे आहेत 'बिग बॉस १६'चे टॉप ४ स्पर्धक

Bigg Boss 16 Grand Finale : शालीन भनोट आऊट, आता उरले फक्त चार; हे आहेत 'बिग बॉस १६'चे टॉप ४ स्पर्धक

googlenewsNext

Bigg Boss 16 Grand Finale : 'बिग बॉस १६' चा विजेता कोण होणार या प्रश्नाचं उत्तर मिळायला आणखी काही तास शिल्लक आहेत. रात्री १२ च्या ठोक्याला बिग बॉसच्या विजेत्याचं नाव घोषीत होणार आहे. १९ आठवड्यांपूर्वी १७ स्पर्धकांसोबत 'बिग बॉस १६'ची सुरूवात झाली होती. सरतेशेवटी उरले केवळ पाच. टॉप ५ स्पर्धकांमध्ये प्रियंका चहर चौधरी, शिव ठाकरे, एमसी स्टॅन, शालीन भनोट आणि अर्चना गौतम हे पाच स्पर्धक टॉप ५ मध्ये पोहोचलेत. पण आता यापैकी एक स्पर्धक शर्यतीतून बाद झाला आहे.

होय, शालीन भनोट टॉप ५ मधून बाद झाला आहे. मतांच्या आधारावर शालीन भनोट एलिमेनेट झाला. आता शिव, अर्चना, एमसी स्टॅन व अर्चना असे चार टॉप  स्पर्धक शर्यतीत उरले आहेत. शालीन भनोट आऊट होताच, बिग बॉसच्या बक्षिसाची रक्कम १० लाखाने वाढून ३१ लाख ८० हजार झाली. शालीन भनोट या सीझनमध्ये त्याच्या टीनासोबतच्या रोमान्समुळेच अधिक चर्चेत राहिला. चिकनसाठीचं त्याचं वेडही सर्वांनी पाहिलं. सुम्बुल आणि त्याचा एक एपिसोडही गाजला.

 अभिनेता शालिन भानोट बिग बॉसनंतर एकता कपूरच्या फीचर शो 'ब्युटी अँड द बीस्ट'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. शालिनने अभिनेता कुशल टंडनची जागा घेतली आहे. 'बिग बॉस १६'च्या विजेत्याला यावेळी ट्रॉफीसोबत ३१ लाख  ८० हजार रोख रक्कम तसेच i10 Nios ही अलिशान गाडी बक्षीस म्हणून मिळणार आहे. यावेळी 'बिग बॉस १६'ची ट्राफीही एकदम खास आहे. त्यावर घोड्याचं डिझाईन बनलेलं आहे.

Web Title: Bigg Boss 16 Grand Finale Live Updates Shalin Bhanot out Shiv Thakare Priyanka Chahar Choudhary Shalin Bhanot Archana Gautam Mc Stan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.