Bigg Boss Contestants : ‘बिग बॉस मराठी 3’च्या स्पर्धकाची ‘बिग बॉस 16’मध्ये वर्णी? जाणून घ्या तो कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 14:22 IST2022-07-05T14:22:02+5:302022-07-05T14:22:38+5:30

Bigg Boss Contestants List: हिंदी ‘बिग बॉस’च्या संभाव्य स्पर्धकांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. तूर्तास 17 कलाकारांची यादी समोर आली आहे.

bigg boss 16 bigg boss ott participant bb marathi fame jay dudhane might be the part of this | Bigg Boss Contestants : ‘बिग बॉस मराठी 3’च्या स्पर्धकाची ‘बिग बॉस 16’मध्ये वर्णी? जाणून घ्या तो कोण?

Bigg Boss Contestants : ‘बिग बॉस मराठी 3’च्या स्पर्धकाची ‘बिग बॉस 16’मध्ये वर्णी? जाणून घ्या तो कोण?

Bigg Boss Contestants List: सलमान खानचाबिग बॉस’ हा कितीही वादग्रस्त म्हणून ओळखला जात असला तरी या शोची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. सध्या चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती ‘बिग बॉस 16’ची. यंदाही बिग बॉस हा शो टीव्ही व ओटीटीवर येणार, अशी चर्चा आहे. कधी ते मात्र अद्याप माहित नाही. पण हो,‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) आणि ‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT 2) च्या संभाव्य स्पर्धकांच्या नावाची चर्चा मात्र सुरू झाली आहे. तूर्तास 17 कलाकारांची यादी समोर आली आहे. हे सर्व जण हिंदी ‘बिग बॉस ’मध्ये दिसू शकतात, अशी चर्चा आहे. यातलं एक नाव मराठी कलाकाराचं आहे.

होय, ‘बिग बॉस मराठी 3’मधला एक स्पर्धक ‘बिग बॉस 16’मध्ये जाणार, असंही कानावर येतंय. हा स्पर्धक कोण तर जय दुधाणे.

जय दुधाणेनं ‘बिग बॉस मराठी 3’ हा शो गाजवला होता. विजेतेपदाच्या दावेदारांमध्येही त्याचं नाव होतं. पण त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. देखणा आणि उत्तम शरीरयष्टी असलेला हाच जय दुधाणे ‘बिग बॉस 16’मध्ये जाणार अशी चर्चा सुरू झालीये. अर्थात अद्याप याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही. एमटीव्हीवरच्या ‘स्प्लिट्सव्हिला’ या रिअ‍ॅलिटी शोच्या 13 व्या सीझनमधून जय दुधाणे प्रकाशझोतात आला होता.

या नावांचीही चर्चा
‘बिग बॉस 16’मध्ये जाणाऱ्या संभाव्य स्पर्धकांच्या यादीत अनेक जणांची नावं आहे. यात अर्जुन बिजलानी, मुनव्वर फारुकी, दिव्यांका त्रिपाठी, शिवांगी जोशी, टीना दत्ता, अज्मा फल्लाह, शिवम शर्मा,  मुनमुन दत्ता, कॅट क्रिस्टियन, जन्नत झुबैर, फैजल शेख, केविन अल्मासिफर, आरुषी दत्ता, पूनम पांडे, बसीर अली आणि झैद दरबार यांचा समावेश आहे. हे चेहरे बिग बॉस ओटीटी 2 आणि‘बिग बॉस 16’ मध्ये दिसू शकतात, अशी माहिती आहे. अज्मा, शिवम, पूनम आणि मुनव्वर हे कंगना रणौतच्या ‘लॉक अप’ शोमध्ये दिसले होते.

 कोण होस्ट करणार शो?
‘बिग बॉस 16’ हा शो कोण होस्ट करणार तर सलमान खान. होय, यंदाचा सीझनही सलमान हाच होस्ट करणार असल्याचं नक्की आहे. पण ‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT) कोण होस्ट करणार, याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे.  संदर्भात सस्पेन्स कायम आहे. करण जोहरऐवजी ‘बिग बॉस ओटीटी 2’ हा शो हिना खान, फराह खान किंवा करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाश होस्ट करू शकतात, अशी चर्चा आहे.

Web Title: bigg boss 16 bigg boss ott participant bb marathi fame jay dudhane might be the part of this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.