Bigg Boss 15 Grand Finale : तरूणाईच्या लाडक्या करण कुंद्राला ट्रॉफीनं दिली हुलकावणी, चाहत्यांची निराशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 00:08 IST2022-01-30T23:30:44+5:302022-01-31T00:08:36+5:30
Bigg Boss 15 Grand Finale Updates: करण कुंद्रा तरूणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळे तोच हा शो जिंकणार, असा अंदाज बांधला गेला होता. पण...

Bigg Boss 15 Grand Finale : तरूणाईच्या लाडक्या करण कुंद्राला ट्रॉफीनं दिली हुलकावणी, चाहत्यांची निराशा
Bigg Boss 15 Grand Finale : ‘बिग बॉस 15’ची चकाकती ट्रॉफी कोण जिंकणार, याकडे अख्या देशाचं लक्ष लागलं असताना करण कुंद्रा (Karan Kundrra) हा या सीझनच्या विजेतेपदाचा मोठा दावेदार मानला जात होता. पण टॉप 3मध्ये येऊनही करणला अखेरच्या क्षणी बिग बॉसच्या ट्रॉफीनं हुलकावणी दिली. करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश आणि प्रतिक सहजपाल हे तिघं फिनालेमध्ये टॉप 3 मध्ये पोहोचलेत. या तिघांमधून बिग बॉसची चकाकती ट्रॉफी कोण जिंकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना करण कुंद्रा टॉप 3मधून बाद झाला. प्रतिक व तेजस्वीला मिळालेल्या मतांच्या तुलनेत करण पिछाडला आणि त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
करण कुंद्रा तरूणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळे तोच हा शो जिंकणार, असा अंदाज बांधला गेला होता. तेजस्वी प्रकाशसोबतच्या त्याच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीची घरात जोरदार चर्चा होती. नॅशनल टीव्हीवर करण व तेजस्वीने एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिली होती. ही जोडी टॉप 2 मध्ये असणार आणि यापैकी एक जण बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार, असा कयास होता. पण करण कुंद्रा अखेरच्या क्षणी बाद झाला.
आज फिनालेमध्ये निशांत सर्वप्रथम 10 लाखांची रक्कम घेऊन बिग बॉसच्या फिनाले रेसमधून बाहेर पडला. त्याच्यानंतर शमिता शेट्टी, तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा व प्रतिक सहजपाल असे टॉप 4 स्पर्धक उरले होते. या चौघांमधून टॉप 3 ची निवड झाली आणि यादरम्यान शमिता शेट्टी ही फिनाले रेसमधून बाद झाली आहे.
शमिता बाद झाल्यानंतर तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा आणि प्रतिक सेहजपाल असे तिघे विजेतेपदाच्या शर्यतीत उरले होते. पाठोपाठ करण आऊट झाला.