Bigg Boss 15 : "... सूखा हुआ नाना पाटेकर;" सलमान खाननं उडवली बिचुकलेची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 03:51 PM2022-01-01T15:51:47+5:302022-01-01T15:52:15+5:30

Bigg Boss 15 च्या नव्या एपिसोडमध्ये म्युझिक इंडस्ट्रीतील युवा चेहरे जन्नत झुबेर आणि सिद्धार्थ निगम यांच्यासह काही कलाकारही उपस्थित होते. यांच्यासोबत सलमान खाननं (Salman Khan) खुप धमाल केली.

bigg boss 15 colors salman khan made fun of abhijeet bichkule said sukha hua nana patekar | Bigg Boss 15 : "... सूखा हुआ नाना पाटेकर;" सलमान खाननं उडवली बिचुकलेची खिल्ली

Bigg Boss 15 : "... सूखा हुआ नाना पाटेकर;" सलमान खाननं उडवली बिचुकलेची खिल्ली

संपूर्ण जग नववर्षाच्या (New Year 2022) आगमनाचा आनंद साजरा करत असताना कलर्स टीव्हीच्या बिग बॉस 15 (Bigg Boss) या शोमध्ये बाहेरच्या जगाप्रमाणे घरातील स्पर्धकही नववर्षाचं स्वागत करत होते. बिग बॉसच्या या सेलिब्रेशनमध्ये सलमान खानने (Salman Khan) सर्वांसोबत नवीन वर्षाचं स्वागत केलं. नव्या एपिसोडमध्ये सर्वांच जबरदस्त धमाल करताना दिसत आहेत. या एपिसोडमध्ये सलमान खानने अभिजीत बिचकुलेची (Abhijit Bichukle) खिल्ली उडवत त्याला चक्क सुकलेला नाना पाटेकर असं म्हटलं आणि त्यानंतर बिग बॉसच्या घरात एकच हशा पिकला. 

या शोमध्ये अभिजीत बिचुकले सध्या अधिक लाईमलाईटमध्ये आहे. सलमाननं या एपिसोडमध्ये बिग बॉसच्या घरात आलेल्या पाहुण्यांसह बोलताना अनेकदा अभिजीत बिचुकलेचा उल्लेख केला. अनेकदा तो त्याची खिल्लीही उडवताना दिसला.

डान्स शिकण्याच्या प्रयत्न
सलमान शोदरम्यान सिद्धार्थ निगमच्या डान्सचं कौतुक करत होता. यादरम्यान त्यानं अभिजीत बिचुकलेचा उल्लेख करत "डान्सचा डी, म्युझिकचा म आणि संगीताचा स देखील सुकलेल्या नाना पाटेकरला येत नाही," असं म्हटलं. यानंतर बिग बॉसच्या घरात एकच हशा पिकला. सलमाननं बिचुकलेच्या गायनाचीही खिल्ली उडवत त्याला पीएमएस म्हणजेच पंतप्रधान गायक असल्याचं म्हणतही चिडवलं.

Web Title: bigg boss 15 colors salman khan made fun of abhijeet bichkule said sukha hua nana patekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.