WHAT? सहा महिने चालणार ‘बिग बॉस’चा नवा सीझन; नवा ट्विस्ट, नवा हाय होल्टेज ड्रामा अन् बरंच काही...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 17:40 IST2021-06-17T15:57:01+5:302021-06-17T17:40:34+5:30
Bigg Boss 15 : भारतीय टीव्हीवरचा सर्वात मोठा आणि सर्वात वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणा-या ‘बिग बॉस’चे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

WHAT? सहा महिने चालणार ‘बिग बॉस’चा नवा सीझन; नवा ट्विस्ट, नवा हाय होल्टेज ड्रामा अन् बरंच काही...!!
‘बिग बॉस’चे (Bigg Boss) चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, भारतीय टीव्हीवरचा सर्वात मोठा आणि सर्वात वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणा-या ‘बिग बॉस’ बद्दल एक नवी माहिती समोर आली आहे आणि ही माहिती खरी ठरली तर चाहत्यांच्या मनोरंजनाची सहा महिन्यांची सोय होणार आहे. होय, ताज्या माहितीनुसार, ‘बिग बॉस’चा येणारा सीझन (Bigg Boss 15) 3 महिन्यांचा नाही तर तब्बल 6 महिन्यांचा असण्याची शक्यता आहे. (Bigg Boss 15 to Air for Six Months)
स्पॉटबॉयने याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, मेकर्स यंदाचा ‘बिग बॉस’चा सीझन आणखी भव्यदिव्य बनवण्याच्या तयारीत आहेत. ज्यासाठी या सीझनमध्ये एकापेक्षा जास्त कपल्स दिसण्याची शक्यता आहे. काही सामान्य लोकांनाही या शोमध्ये सहभागी होता येणार आहे. नेहमीप्रमाणे सलमान खान हाच या सीझनचा होस्ट असणार आहे.
3 नाही 6 महिने...
वृत्तानुसार, यावेळी ‘बिग बॉस’ 6 महिने चालणार. अर्थात या फॉर्मेटमध्ये एक ट्विस्टही आहे. शोची सुरूवात 12 स्पर्धकांसोबतच होईल. यादरम्यान सुरूवातीला 12 स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घरात जातील. यापैकी 8 स्पर्धक ‘बेघर’ झाल्यानंतर उर्वरित 4 स्पर्धकांसोबत हा शो टीव्ही चॅनल कलर्सवर टेलिकास्ट होईल. इतकेच नाही, ग्रँड प्रीमिअर एपिसोडमध्ये या 4 कंटेस्टंटसोबत काही नवे स्पर्धक घरात एन्ट्री घेतील.
प्र्रत्येक इविक्शनसोबत घरात एक वाइल्ड कार्ड एन्ट्रीही होणार. म्हणजे एक स्पर्धक बेघर झाला की त्याच आठवड्यात नवा स्पर्धक येणार. मेकर्सचा हा प्लान यशस्वी झाला तर ‘बिग बॉस’मध्ये अनेक नवे व लोकप्रिय चेहरे बघायला मिळू शकतात. शिवाय हाय होल्टेड ड्रामाही. अर्थात अद्याप मेकर्सकडून याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.