'बिग बॉस १४' ची विजेती रुबीना दिलैक अभिनयाव्यतिरिक्त या गोष्टी करण्यात बिझी ? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 17:19 IST2021-10-30T17:19:25+5:302021-10-30T17:19:38+5:30

'बिग बॉस १४' ची विजेती बनल्यानंतर अभिनेत्री रुबीना दिलैककडे फारशा काही ऑफर्स नाहीत. त्यामुळे या शोनंतर तिला बरीच काम मिळतील असे वाटत असले तरी असे मात्र काही घडले नाही.

'Bigg Boss 14' winner rubina dilaik Now Daysbusy doing these things Instead Of Acting? Find out | 'बिग बॉस १४' ची विजेती रुबीना दिलैक अभिनयाव्यतिरिक्त या गोष्टी करण्यात बिझी ? जाणून घ्या

'बिग बॉस १४' ची विजेती रुबीना दिलैक अभिनयाव्यतिरिक्त या गोष्टी करण्यात बिझी ? जाणून घ्या

प्रत्येकाला काही ना काही छंद किंवा आवड असते. सर्वसामान्य असो किंवा मग सेलिब्रिटी, सगळेच आपला छंद आणि आवड जोपासताना पाहायला मिळतात.कलाकार मंडळी अभिनयासह इतर गोष्टींमध्येही तितकेच पारंगत असतात. वैयक्तिक आयुष्यात अभिनयासह निरनिराळ्या गोष्टी करणं कलाकारांना आवडतं. शुटिंगच्या रोजच्या बिझी शेड्युअलमध्ये स्वतःसाठी वेळ घालवत कलाकार त्या क्षणाचा आनंद घेत असतात. रुबीना  सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. मोठ्या संख्येने चाहते तिला फॉलो करतात. तिचा प्रत्येक अंदाज तिच्या चाहत्यांसाठी खास असतो. तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता असते.  


'बिग बॉस १४' ची विजेती बनल्यानंतर अभिनेत्री रुबीना दिलैककडे फारशा काही ऑफर्स नाहीत. त्यामुळे या शोनंतर तिला बरीच काम मिळतील असे वाटत असले तरी असे मात्र काही घडले नाही. त्यामुळे सध्या ती काय करते ? कुठे बिजी आहे या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर सोशल मीडिया हे उत्तम माध्यम आहे. सोशल मीडियावर तिच्या प्रत्येक गोष्टीची माहीती रुबीना चाहत्यांना देत असते. 

रुबीना दिलैकचा असाच काहीसा छंद जगासमोर आला आहे.  रुबिनाने तिचे काही नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. याच फोटोमुळे तिला असलेली आवड जगासमोर आली आहे. रुबिना तिच्या आईसोबत स्वयंपाक करताना दिसत आहे.सध्या रुबीना तिच्या गावी म्हणजेच  हिमाचलमध्ये आहे . हिमाचलमध्ये निवांत क्षण घालवताना ती दिसते आहे. रुबीनाचा कुकींचा हा व्हिडीओवर चाहत्यांचा लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी  रुबीनाचे पती अभिनवसह अजिबात पटत नव्हते. दोघांनी घटस्फोट घेण्याचाही निर्णय घेतला होता. अखेर शोमध्ये पुन्हा ते एकत्र आले. आता दोघेही एकमेकांसह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसतात.आता दोघांमध्ये खूप चांगले बॉन्डींगही निर्माण झाले आहे. 
 

Web Title: 'Bigg Boss 14' winner rubina dilaik Now Daysbusy doing these things Instead Of Acting? Find out