Bigg Boss 14: बिग बॉसच्या घरातून या तिघांना दाखवला बाहेरचा रस्ता?, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 18:15 IST2020-10-20T18:12:46+5:302020-10-20T18:15:13+5:30

बिग बॉसचा चौदाव्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या शोमधून तिघांना बेघर केल्याचे बोलले जात आहे.

Bigg Boss 14: Show these three the way out of Bigg Boss's house ?, Learn about it | Bigg Boss 14: बिग बॉसच्या घरातून या तिघांना दाखवला बाहेरचा रस्ता?, जाणून घ्या याबद्दल

Bigg Boss 14: बिग बॉसच्या घरातून या तिघांना दाखवला बाहेरचा रस्ता?, जाणून घ्या याबद्दल

बिग बॉसचा चौदाव्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या शोमधील एक हैराण करणारी बाब समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉसच्या घरातून पवित्रा पुनिया, शहजाद देओल आणि एजाज खान यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 


द खबरी नामक ट्विटर हँडलनुसार, पवित्रा पुनिया, शहजाद देओल आणि एजाज खान सिद्धार्थ शुक्लाच्या टीममध्ये होते आणि त्यांना एक टास्क करायला सांगितले होते. मात्र या टास्कमध्ये सिद्धार्थची टीम हरली. या कारणामुळे त्या तिघांना घरातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. निक्की तांबोळीदेखील या टीमचा हिस्सा होती. ती पहिल्यापासून कन्फर्म सदस्य होती. त्यामुळे ती अद्याप घरातच आहे. रिपोर्ट्सनुसार, टास्क हरल्यानंतर बिग बॉसने पवित्रा पुनिया, शहजाद देओल आणि एजाज खान यांना घरातून बाहेर जायला सांगितले आहे. 


सोमवार का वॉर भागात सलमान खानने सर्व घरातल्यांचा क्लास घेतला आहे आणि सीनिअर्स सिद्धार्थ शुक्ला, गौहर खान आणि हिना खानला देखील एक टास्क दिला. या अंतर्गत त्यांना आगामी दिवसात शोमध्ये कोणत्या स्पर्धकाला पहायचे नाही अशांची फ्रेशर्सची नावे सांगायला लावली होती.


अद्याप हे स्पष्ट झाले नाही की तिघांना खरेच बेघर केले आहे कि त्यांना कोणत्या सीक्रेट रुममध्ये पाठवले आहे. तर अशी चर्चा आहे की तिन्ही सीनियर्स आता बिग बॉसच्या घरातून गेले आहेत आणि लवकरच घरात तीन नवीन सीनिअर्सची एन्ट्री होणार आहे. यात रश्मी देसाई, आसिम रियाज आणि गौतम गुलाटीच्या नावाची देखील चर्चा आहे.

Web Title: Bigg Boss 14: Show these three the way out of Bigg Boss's house ?, Learn about it