राखी सावंतच्या आईला झालाय कर्करोग, आईची अवस्था पाहून राखीला आवरले नाहीत अश्रू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 13:17 IST2021-01-11T13:13:38+5:302021-01-11T13:17:57+5:30
राखीच्या आईची तब्येत आता खराब झाली असून आईची अवस्था पाहून राखीला रडू कोसळले आहे.

राखी सावंतच्या आईला झालाय कर्करोग, आईची अवस्था पाहून राखीला आवरले नाहीत अश्रू
बिग बॉस १४ मध्ये आपल्याला आतापर्यंतच्या सिझनमध्ये दिसलेले काही सेलिब्रेटी पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. बॉलिवूडची कॉन्ट्राव्हर्सी क्वीन राखी सावंत सध्या बिग बॉसच्या चौदाव्या सीझनमध्ये झळकत आहे. पूर्वीच्या सिझनमध्ये राखीमुळे कार्यक्रमाला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. राखी पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये जाऊन हंगामा करत आहे. पण आता राखीच्या आईची तब्येत आता खराब झाली असून आईची अवस्था पाहून राखीला रडू कोसळले आहे.
बिग बॉसच्या फॅमिली वीक टास्कमध्ये राखी आणि तिच्या आईची व्हिडिओ कॉलद्वारे भेट झाली. त्यावेळी राखीच्या आईने तिच्यावर उपचार सुरू असून तिला खूपच त्रास होत असल्याचे राखीला सांगितले. आईची ही अवस्था पाहून राखी एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडू लागली. राखीसोबत घरातील सगळ्याच स्पर्धकांच्या डोळ्यांत अश्रू आले होते.
राखीचा भाऊ राकेश सावंतने याबाबत टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, माझ्या आईला पोटाचा कर्करोग झाला आहे. लवकरच तिचे ऑपरेशन केले जाणार आहे. तिला ऑपरेशनच्याआधी एकदा राखीला भेटायचे होते. पण राखी बिग बॉसच्या घरात असल्याने हे शक्य नाहीये. पण फॅमिली वीकदरम्यान तिला राखीशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलण्याची संधी मिळाली. राखी ही आईची प्रचंड लाडकी आहे. त्यामुळे तिला पाहून आई खूपच खूश झाली.
राखीच्या भावाने पुढे सांगितले की, लॉकडाऊनमध्ये राखीकडे काहीच काम नव्हते. त्यामुळे तिच्याकडे पैसे देखील नव्हते. त्यामुळे तिची अवस्था खूपच वाईट झाली होती. तिचे लग्न देखील लॉकडाऊन लागायच्या काहीच दिवसांपूर्वी झाले आणि त्याचमुळे ती रितेशला भेटू शकलेली नाही.
राखी सावंतचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले असल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे सांगितले होते. तिचा नवरा युकेमध्ये राहातो. तो लवकरच बिग बॉसच्या घरात झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. राखीचा पती कधीच लोकांच्या समोर आलेला नाहीये. त्यामुळे तो कसा दिसतो हे कोणालच माहीत नाहीये.